ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

हिंगणघाट शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ लगत संविधान चौक येथील कलोडे सभागृह समोरील पुरपीडित जागेवरील अतिक्रमण धारकांना दुसरीकडे पुनर्वसन करून त्या ठिकाणी ग्रामीण पोलिस स्टेशन मिळण्यासाठी पाठपुरावा करा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ना.जयंत पाटील साहेब यांना अतुल वांदिले यांचे निवेदन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

हिंगणघाट :- शहरातून गेलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ लगत संविधान चौक येथील संत तुकडोजी वार्ड, शेत सर्वे न. १७६/२ मौजा पिंपळगाव, या जागेवर हिंगणघाट शहरात वाढती गुन्हेगारी पाहता ग्रामीण पोलिस स्टेशन मिळण्यासाठी पाठपुरावा करा असे निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ना.जयंत पाटील साहेब यांना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी निवेदन दिले आहे.

          विदर्भातील सर्वात मोठा तालुका म्हणून हिंगणघाट शहराची ओळख आहे. व शहराची लोकसंख्या ही पावणे दोन लाख आहे.

 तसेच हिंगणघाट शहराला ब्रिटिश काळापासून औद्योगीक शहर म्हणून ओळखले जाते.शहरातील एकाच पोलिस स्टेशनला ग्रामीण भागातील ७० पेक्षा जास्त खेडे गावे या शहराला जुळलेले आहे. त्यामुळे सुमारे अडीच लाख लोकसंख्याचा भार पोलिस स्टेशन मधील फक्त ११५ पोलिस कर्मचाऱ्याचा खाद्यां वर आहे. त्यातही केवळ सहाच वाहतूक पोलिस कर्मचारी आहे. हिंगणघाट शहर मोठी लोकसंख्या असलेले नगर पालिका व तहसील मुख्यालयाचे शहर आहे.

शहरातून राष्ट्रीय महामार्ग गेल्याने अवजड वाहनाची २४ तास वर्दन असते. शहरातील शांतता, सुव्यवस्था राखण्यासाठी एकाच पोलिस स्टेशनवर भार पडत आहे. या आधी राष्ट्रवादी कॉग्रेस शरदचंद्र पवार पक्षा कडून ग्रामीण पोलिस स्टेशनची मागणी केली होती. या बाबत अधिकारी यांनी सर्वे सुद्धा केला होता. व त्या वेळेस ग्रामीण पोलिस स्टेशनसाठी मंजूरी सुद्धा मिळणार होती. परंतु नंतर मंजूरी कुठे थांबली माहिती नाही.

हिंगणघाट शहरातील व ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात वाढते गुन्हे व अवैद्य धंदे तसेच हिंगणघाट पोलिस स्टेशनला पोलिस कर्मचारी कमी पडत असल्यामुळे वाढत्या गुन्हेगारीवर आळा घालण्यास शक्य होत नाही. त्यासाठी शेत सर्वे न. १७६/२ पुरपीडित असलेल्या खुल्या जागेत (कलोडे सभागृह समोरील) संत तुकडोजी वार्ड, मौजा पिंपळगाव, राष्ट्रीय महामार्ग क्र. ४४ लगत या जागेवर हिंगणघाट शहरातील वाढती गुन्हेगारी पाहता ग्रामीण पोलीस स्टेशन मिळण्यासाठी पाठपुरावा करा असे या निवेदन राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते ना.जयंत पाटील साहेब यांना प्रदेश सरचिटणीस अतुल वांदिले यांनी दिले आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये