माजरी ग्रामपंचायतीने केलेल्या विकास कामात लाखोचा भ्रष्टाचार
सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी यांचे संगनमत : पत्र परिषदेत चौकशीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
सरपंच आणि ग्राम विकास अधिकारी यांनी संगणमत करुन निकृष्ठदर्जाचे विकास कामे करुन मोठ्या प्रमाणात आर्थीक गैरव्यवहार केला. आपण गेल्या दोन वर्षापासून मासिक समेत चौकशीची मागणी करीत आहे.मात्र याकडे लक्ष दिल्या नाही. असा आरोप माजरी येथील सामाजिक कार्यकर्ते सतिश कुडूदुला यांनी पत्रपरिषदेत केला.
१० दिवसात चौकशी करून कारवाई न झाल्यास माजरी ग्राम वासीयांना घेवून आंदोलन करू असा निर्वानिचा ईशारा यावेळी त्यांनी दिला.
सरपंच छाया जंगम व ग्रामविकास अधिकारी राजेन्द्र गणविर या दोघांनी गेल्या २ वर्षापासून अनेक कामे निकृष्ट दर्जाचे करुन त्या माध्यमातून चांगलीच माया जमविली आहे. विरोधकांच्या वार्डमध्ये कामे न करणे, वार्ड क्रमांक ५ मध्ये गेल्या २ वर्षापासून नाली सफाई, पथदिवे, रस्ते, या कामाकडे दुर्लक्ष केल्या जात आहे.१५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून येथे तयार केल्या गेलेल्या रस्ते व नाल्या काही दिवसातच वाहून गेल्या.प्रत्येकी ३० ते ३५ हजार रुपयात खरेदी केलेले अनेक सोलर लाईट बंद पडले आहे. अनेकदा मासिक सभेत सांगून सुद्धा लक्ष दिल्या जात नाही.
अशा प्रकारे जनतेच्या पैशाची उधलपट्टी केल्या जात आहे.या ग्रामपंचायतला वेकोलिद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे.त्यामुळे या ग्राम पंचायतीने अद्यापही खासगी नळाद्वारे पाणी पुरवठ्याची पर्यायी व्यवस्था केली नाही. त्याऐवजी प्रत्येक वार्डामध्ये कुपनलिका दिल्या. त्यातील अनेक बंद पडल्या आहेत.वेकोली कडून पाणी पुरवठा न झाल्यास ग्रामस्थांना २ ते ३ किलोमिटर लांबुन पाणी आणावे लागत असल्याचे त्यांनी सांगीतले. रोगराई पसरू नये म्हणून खरेदी केलेले औषधी फवारणी यंत्र धूळ खात पडले आहे. औषधाची फवारणी न झाल्याने डासांचे प्रमाण वाढून मलेरिया सारखे रोगाचे प्रमाण वाढत आहे.
या सर्व कामात १४ व १५वित्त आयोग, सामान्य निधी आणि ईतर माध्यमातून मिळनाऱ्या निधीचा गैरवापर झाला असून त्याद्वारे झालेल्या कामाची चौकशी करुन दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेवटी सतीश कुडूदुला यांनी केला. या पत्रपरिषदेला सतिश कुडूदुला व अवदेश भारती उपस्थित होते.