ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिवतीतील मुख्य चौकातील सीसीटीव्ही कॅमेरे बंद!

संपूर्ण शहरात नवीन कॅमेरे लावण्याची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. संतोष इंद्राळे

जिवती :- शहरातील वाढत्या गुन्हेगारीवर अंकूश ठेवण्यासाठी पोलीस विभागा मार्फत जिवती शहरातील तिन मुख्य चौकात पाच वर्षांपुर्वी लावलेले सीसीटीव्ही कॅमेरे आता केवळ शोभेची वस्तु झाले आहे. शहरातील तिन महत्वपूर्ण ठिकाणी लावलेल्या नऊ कॅमेऱ्यांपैकी एकही कॅमेरा सध्या कार्यरत नाही. पोलीस विभागाकडून हे कॅमेरे लावण्यासाठी लाखो रुपयांचा खर्च केला. पंरतु याचा उपयोग कधीच कुणालाही झाला नाही. पोलीस विभागाच्यावतीने शहरातील वीर बाबुराव शेडमाके चौक व बिरसा मुंडा चौक तसेच बसस्थानक परिसरातील चौकात कॅमेरे लावण्यात आले होते.या कामासाठी लाखो रुपयांचा खर्च करण्यात आला. तेव्हा त्या कॅमेऱ्याची देखभाल दुरुस्तीची व्यवस्थाही करण्यात आली. व या कॅमेरा नियंत्रण कक्ष निर्माण करण्यात आला.

यातून शहरावर मुख्य चौकावर तिसऱ्या डोळ्यातून लक्ष ठेवणे सुरु झाले होते. व पोलीस प्रशासनाला आरोपींचा शोध घेण्यास मोलाची मदत होवू लागली होती, परंतु सध्या देखभाल दुरुस्ती अभावी हे कॅमेरे चालेनासे झाले आहेत. आता नादुरुस्ती झालेल्या कॅमेराकडे कुणी लक्षही द्यायला तयार नाही. पोलीस विभागाने नामवंत कंपनीचे कॅमेरे खरेदी केले असतांना काही महिन्यातच कॅमेरे कसे काय बंद झाले हा संशोधनाचा विषय आहे. त्यामुळे या कॅमरेच्या दर्जावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.शहरात सीसीटीव्ही कॅमेरे लागल्यानंतर गुन्हेगारांना व अवैध धंदे करणाऱ्यांना वटणीवर आणण्यात पोलीस प्रशासनाला मोठे यश येईल असे वाटले होते. पंरतु आता हे कॅमेरेच बंद झाल्याने गुन्हेगारांना मोकळे रान झाले आहे.

शहरातील मुख्य ठिकाणी कॅमेरे लावण्याची मागणी

शहरातील वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण जिवती शहरातील मुख्य बाजारपेठ, प्रमुख रस्ते, शाळा, महाविद्यालय, सर्व शासकीय कार्यालयातील परिसर येथे पोलिसांचा तिसरा डोळा म्हणजे सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची मागणी नागरिक करीत आहेत. जर संपूर्ण शहरात संबंधित विभागाकडून सीसीटीव्ही कॅमेरे लागले तर शहरात होणाऱ्या घरफोड्या, हाणामाऱ्या, चौकात होणारी छोटी-मोठी भांडणे, अवैध धंदे,महिला व युवतींच्या छेडछाडीच्या अश्या अनेक गुन्हेगारीवर वॉच ठेवण्यासाठी पोलिसांचा तिसरा डोळा समजला जाणारा सीसीटीव्ही कॅमेराच विघ्नहर्ता ठरू शकतो.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये