ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वढोलीच्या गणेश मंडळाच्या सेवाभावी उपक्रमाला किशोर वडेट्टीवारांचे कौतुकाचे बळ!

डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मेवाटप शिबिर उत्साहात; ६०० गरजूंनी घेतला लाभ, २८० जणांना चष्म्याचे वाटप

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. राजेश डोंगरे

गोंडपिपरी :_ गणेशोत्सवाच्या माध्यमातून केवळ धार्मिक उत्सव न साजरा करता सामाजिक बांधिलकी जपत समाजोपयोगी उपक्रम राबविणाऱ्या वढोली येथील सार्वजनिक मस्कऱ्या गणेश मंडळ तथा टायगर ग्रुपच्या उपक्रमाचे काँग्रेस नेते किशोरभाऊ वडेट्टीवार यांनी कौतुक केले. करंजी–खराळपेठ जिल्हा परिषद क्षेत्राच्या दौऱ्यादरम्यान त्यांनी वढोली येथे आयोजित डोळे तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया व चष्मेवाटप शिबिराला भेट देत मंडळाच्या कार्याचे अभिनंदन केले.

वढोली येथील गणेश मंडळाच्या वतीने ज्येष्ठ नागरिकांसह गरजू नागरिकांसाठी डोळे तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराचा तब्बल ६०० गरजूंनी लाभ घेतला, तर तपासणीनंतर २८० व्यक्तींना मोफत चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच८८ गरजू रुग्णांच्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली.

यावेळी मार्गदर्शन करताना वडेट्टीवार म्हणाले की, लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाला केवळ धार्मिक स्वरूप न देता समाजाला संघटित करण्यासाठी, जनजागृती, सामाजिक एकोपा आणि राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची संकल्पना पुढे आणली. आज वढोलीतील गणेशोत्सवाने या विचाराला सामाजिक सेवेची जोड दिली आहे, ही निश्चितच अभिमानाची बाब आहे.

“ज्येष्ठ नागरिकांच्या डोळ्यांची तपासणी, मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया आणि गरजूंना चष्मेवाटप करून नवीन दृष्टी देण्याचे काम म्हणजे ‘गणेशोत्सवातून समाजसेवा’ या विचाराचा आदर्श नमुना आहे,” असे वडेट्टीवार यांनी सांगितले. मंडळाच्या सामाजिक उपक्रमाचे कौतुक करताना भविष्यात या सेवाभावी कार्यासाठी कोणतीही मदत अथवा सहकार्याची गरज भासल्यास आपण सदैव सहकार्य करू, अशी ग्वाहीही त्यांनी दिली

यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सदस्य कमलेश निमगडे, वढोलीचे सरपंच राजेश कवठे, तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक रेचनकर, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष महेंद्र कुनघाटकर, सोशल मीडिया प्रमुख राजेश डोंगरे, पांडुरंग कोहपरे, वासुदेव झाडे रुपेश निमसरकार सर यांच्यासह काँग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

“उत्सव तोच खरा, जो समाजाच्या उपयोगी पडतो,” या भावनेतून वढोली गणेश मंडळाने राबविलेल्या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. यावेळी टायगर ग्रुप गोंडपपिपरीचे अध्यक्ष निखिल नामेवार, मस्कऱ्या गणेश मंडळाचे अध्यक्ष अनुप कोहपरे, भास्कर चौधरी, गौरव झरकर, निखिल कोहपरे, आकाश कोहपरे, वैभव कोहपरे, विशाल मंगाम, हर्षल कोसरे, गोपाल चौधरी, विभोर नामेवार इत्यादी पदाधिकारी कार्यकर्त्यांनी कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये