ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगड कडून बैलमपूर येथे काँक्रेट रोड बांधकामचे भूमिपूजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड, माणिकगढ कडून आपल्या सीएसआर अंतर्गत जवळपास असलेल्या गांवात सतत विकास कार्य सुरु आहेत.
यावेळेस माणिकगड सीएसआर कडून 100 मीटर काँक्रेट रोड बांधकामाचे भूमिपूजन ग्रामपंचायत जामणी चे सरपंच जगदीश किन्नाके व उपसरपंच अशोक चांदेकर यांच्या हस्ते करण्यात आलेत.
हा रोड मच्छिनाला ते कॉन्व्हयोर बेल्ट कडे जाणारा असून या अगोदर माणिकगडणे 60 मीटर बांधून दिला होता.
या रोड बांधकाममुळे बैलमपूर गांवतील लोकांना ये जा करण्यास, तसेच हिरापूर कडे जाणाऱ्या व शेतांत जाणाऱ्या लोकांना याचा खूप फायदा होईल असे उपसरपंच अशोक चांदेकर यांनी सांगितले.
या वेळी गांवतील नागरिक उपस्थित होते.