ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पिसाळलेली माकडे पकडुन दूर जंगलात सोडा

प्रभाकर खांडेभराड यांची मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा येथील माळीपुरा व सावता माळी नगर येथे माकडांनी हैदोस घातला आहेस तेव्हा पिसाळलेल्या माकडांना वन विभाग ने तत्काळ पकडुन जंगलामध्ये सोडा अशी मागणी प्रभाकर खांडेभराड व नागरिकांनी वनपरिक्षेत्र अधिकारी यांना प्रत्यक्ष भेटून निवेदन देऊन कऱण्यात आली आहे.

40 ते 50 माकडाच्या कळपाने या परीसरात मोठया प्रमाणात दहशत निर्माण केली आहे, पिसाळलेली माकडे एखाद्याला चावा घेऊ शकते, तसेच घराच्या वरील टिन पत्रे खिळखिळी करुण टाकली आहे.

यापूर्वी सुद्धा सखाराम गणपत झोरे या वृद्धाचा माकडाने जख्मी केल्याने मृत्यू झाला आहे,या कुटुंबाला शासनाचे कोणतीही नुकसान भरपाई दिली नाही. वन विभागाणे तात्काळ माकडांना पकडुन जंगलात सोडावे अशी मागणी निवेदनात केली आहे, निवेदनावर परिसरातील शेकडो नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये