ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महात्मा गांधी कॉलेज सायन्स महाविद्यालयामध्ये जागतिक महिला दिन साजरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

गडचांदूर शिक्षण प्रसारक मंडळ द्वारा संचालित महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स, गडचांदूर येथे आंतरिक तक्रार समिती द्वारा आयोजित आंतरराष्ट्रीय महिला दिन साजरा करण्यात आला. यावेळी पारंपरिक वेशभूषा दिनाचाही आनंद विद्यार्थ्यांनी घेतला.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. शैलेन्द्र डी. देव होते, त्यांनी महिलांच्या सन्मानार्थ आपले अध्यक्षस्थान महाविद्यालयातील एकमेव महिला कर्मचारी कु. शबाना शेख (प्रयोगशाळा सहाय्यक) यांना दिले. तसेच डॉ. शारदा येरमे (सहाय्यक प्राध्यापक आणि वैद्यकीय अधिकारी, शासकीय रुग्णालय, चंद्रपूर), ॲड. दिपांजली मंथनवार, डॉ. प्रणाली गोवारदीपे आणि किरण कुंडू (मुख्याध्यापिका स्कॉलर अकॅडमी गडचांदूर) या मान्यवरांनी कार्यक्रमात विशेष मार्गदर्शन केले.

डॉ. शारदा येरमे यांनी महिलांसाठी शिक्षणाच्या संधी, संस्कृतीचे जतन, संयुक्त कुटुंब प्रणाली आणि महिलांच्या स्वप्नपूर्तीसाठी शिक्षणाचे महत्त्व या विषयावर विचार मांडले. ॲड. दीपांजली मंथनवार यांनी महिलांचे हक्क आणि त्यांच्या सशक्तीकरणासाठी कायद्याचा योग्य उपयोग कसा करावा यावर मार्गदर्शन केले.

डॉ. प्रणाली गोवारदीपे यांनी पीसीओडी, सिकल सेल, पोषण आहार आणि मुलींमध्ये होणाऱ्या मासिक पाळीतील समस्या याविषयी महत्त्वपूर्ण माहिती दिली. कुमारी किरण कुंडू यांनी विद्यार्थिनींना प्रेरणादायी मार्गदर्शन केले.

प्राचार्य डॉ. शैलेन्द्र देव यांनी आपल्या भाषणात आईच्या भूमिकेचे महत्त्व आणि कुटुंब तसेच मुलांच्या विकासातील तिचे योगदान यावर प्रकाश टाकला.

कार्यक्रमाचे अध्यक्षीय भाषण शबाना शेख यांनी केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी कु. अष्टमी मुंडे हिने केले. प्रास्ताविक प्रा. कुमारी पूर्णिमा बोधे यांनी केले, तर द्वितीय वर्षाच्या विद्यार्थिनी नेहा भोयर हिने आभार प्रदर्शन केले.

या कार्यक्रमाला प्राध्यापक, विद्यार्थी आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्साहात पारंपरिक दिनाचा आनंद घेतला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये