ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तेली समाजातील महिलांनी उत्साहात साजरा केला महिला दिन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

तेली समाज महिला मंडळ गडचांदूर तथा संताजी महिला बचत गट यांचे संयुक्त विद्यामाने ज्येष्ठ नागरिक सभागृह गडचांदूर येथे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी तेली समाजातील महिलांनी तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संत शिरोमणी संताजी जगनाडे महाराज आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण तसेच समाजातील वरिष्ठ सदस्यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. महिलांच्या विविध सूप्त गुणाचे सादरीकरण करून महिला शक्तीचा जागर करण्यात आला.

विविध स्पर्धांचे आयोजन करून विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात आले.यावेळी तेली समाजातील महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये