जिल्हा सामान्य रुग्णालयात काचबिंदू सप्ताह कार्यक्रम संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
दिनांक ०९ मार्च ते १५ मार्च २०२५ या कालावधीमध्ये राष्ट्रीय अधंत्व नियंत्रण व दृष्टी क्षीणता कार्यक्रम, नेत्र विभागातुन काचबिंदू मोहिम राबविण्यात आली यामध्ये नेत्र बाहय रुग्ण विभागात रुग्णांची नेत्र तपासणी करूण काचबिंदू बाबत माहिती देण्यात आली तसेच उद्भवणारा आजार व त्यावरील उपचार याबद्दल सुद्धा माहिती देण्यात आली जनमानसात या आजाराबाबत जनजागृतीचे माहिती पत्रके वाटण्यात आली.
तसेच आज दि १३ मार्च २०२५ रोजी मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्षा डॉ. प्रिती पराडकर, जिल्हा नेत्र शल्य चिकित्सक, सारू वर्धा यानी उपस्थित विद्यार्थी व रुग्णांना काचबिंदू तपासणीच्या सोई-सुविधा जिल्ह्यात उपलब्ध ठिकाणांचे माहिती सादर केली प्रमुख पाहुणे म्हणून डॉ मोहण सुटे, नेत्र रोग तज्ञ व डॉ. ज्योती अमृतकर, नेत्र रोग तज्ञ यांनी काचबिंदू आजारावर उपचार पद्धती व शस्त्रक्रिया प्रक्रियेवर मोलाचे मार्गदर्शन केले श्रीमती ज्योती गजभिये, अधिसेविका आणि शालिनी कोरेटी सहायक अधिसेविका या कार्यक्रमाला प्रामुख्याने उपस्थित होत्या.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्रीमती संगीता काकडे, अधिपरिचारीका यांनी केले तर संचालन प्रफुल काकडे, नेत्रदान समुपदेशक, सा. रू. वर्धा तर आभार श्री संजय बोबडे, क्षेत्र चिकित्सा अधिकारी यानी केले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता शारदा तोडसाम, निखिल नानवटकर, कोमल उरकुडे, मंगेश राऊत, मनोज गुरनुले, किशोर मंहतवाणे, याचा सहभाग लाभला