ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जय महाराष्ट्र शासकीय, निमशासकीय संघटनेचे राज्यव्यापी आंदोलन

पंचायत समिती भद्रावती येथील कर्मचाऱ्यांचे कामबंद आंदोलन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

          जय महाराष्ट्र शासकीय निमशासकीय संघटनेचे राज्य अध्यक्ष अशोक डहाळे यांच्या नेतृत्वात संपूर्ण राज्यभर कामबंद आंदोलन सुरू असून त्याचे पडसाद चंद्रपूर जिल्ह्यातील भद्रावती पंचायत समितीत सुद्धा दिसून आले. दिनांक १६ फेब्रुवारी पासून सुरू असलेल्या असहकार आंदोलनाची शासनाने दखल न घेतल्याने दिनांक २३ फेब्रुवारी पासून कामबंद आंदोलन सुरू करण्यात आले आहे.

पंचायत समितीच्या प्रांगणात लिपिक वर्गीय कर्मचारी ठिय्या मांडून बसल्यामुळे कामकाज ठप्प झाले.त्याचा फटका कामाकरीता आलेल्या नागरिकांना बसतो आहे.

चौथ्या वेतन आयोगानुसार लिपिकांच्या वेतनातील त्रुटी दूर करणे, नोव्हेंबर २००५ नंतरच्या कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना लागू करणे , वरिष्ठ व कनिष्ठ सहाय्यक यांचे पदनाम बदल करणे , पदोन्नतीचे स्तर कमी करणे, आदी मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी पंचायत समिती भद्रावती अंतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र, लघुसिंचाई विभाग, एकात्मिक बाल विकास, सेवा योजना प्रकल्प कार्यालय, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद हायस्कूल आदी कर्मचारी सहभागी झाले आहेत.

एकच मिशन जुनी पेन्शन, च्या घोषणेत, सर्व पुरुष व महिला कर्मचारी आंदोलनात सहभागी झाल्याने कार्यालयीन कामाचा फज्जा उडाल्याचा प्रत्यय येत होता. तर आंदोलनकर्त्या कर्मचाऱ्यांमध्ये शासनाच्या दुर्लक्षित धोरणा विरोधात असंतोष खदखदत होता. आमदारांना पेन्शन आणि सर्व हयात भर शासकीय योजनांची अंमलबजावणी करणाऱ्या कर्मचाऱ्यांना टेन्शन खपवून घेतले जाणार नाही अशी ठोस भूमिका आंदोलनकर्त्यांनी स्पष्ट केली.

उपोषण स्थळी जाऊन प्रत्यक्ष आढावा घेतला असता उपस्थित कर्मचाऱ्यांनी पुढील प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये