महात्मा गांधी महाविद्यालयामध्ये विद्यार्थिनी साठी करिअर वर कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
येथील महात्मा गांधी कॉलेज ऑफ सायन्स मध्ये दिनांक 16 फेब्रुवारी ते 18 फेब्रुवारी दरम्यान तीन दिवसीय करियर संदर्भात कार्यशाळा संपन्न झाली. ही कार्यशाळा नंदी फाउंडेशन, महिंद्रा कंपनी तर्फे सामाजिक जबाबदारीची भावना ठेवून वेगवेगळ्या महाविद्यालयांमध्ये आयोजित करते. या कार्यशाळेमध्ये विशेषता उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींसाठी करियर संदर्भात मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते ज्यामध्ये व्यक्तिमत्व विकास मुलाखत कशी द्यायची संवाद कौशल्य कामाच्या ठिकाणी पाळली जाणारी नैतिकता इत्यादी सर्व गोष्टीचे मार्गदर्शन या फाउंडेशन तर्फे महाविद्यालयामध्ये दिले गेले. या कार्यक्रमाचे आयोजक प्रा. पवन चटारे करिअर गायडन्स आणि प्लेसमेंट सेल यांनी केले असून अध्यक्षता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शैलेंद्र देव यांनी केले.
जवळपास 40 विद्यार्थिनींनी या कार्यशाळेचा लाभ घेतला असून भविष्यात रोजगाराभिमुख यशस्वीतेसाठी त्यांना या कार्यशाळेचा उपयोग होणार आहे.



