अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड सिमेंट वर्क्स सीएसआर उपक्रमांतर्गत ढुमने लेआउट, गडचांदूर येथे आरोग्य शिबिर संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड माणिकगड सिमेंट वर्क्स सीएसआर उपक्रमांतर्गत ढुमने लेआउट, गडचांदूर येथे आरोग्य शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले.
या आरोग्य शिबिराचा उद्देश समाजातील प्रत्येक घटकापर्यंत आरोग्य सेवा पोहोचवणे हा होता. सीएसआर अंतर्गत वेळोवेळी विविध विकासकामे राबविण्यात येतात, त्याच अनुषंगाने या आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले.
शिबिरामध्ये अंगणवाडी केंद्रात स्तनपान करणाऱ्या माता तसेच गर्भवती महिलांची विशेष आरोग्य तपासणी करण्यात आली. यावेळी महिलांचा रक्तदाब (बी.पी.) तपासण्यात आला तसेच आवश्यक औषधांचे वाटप करण्यात आले. तसेच महिलांना आयर्न व कॅल्शियमच्या गोळ्यांचेही वितरण करण्यात आले, ज्यामुळे त्यांच्या आरोग्यात सुधारणा होण्यास मदत होईल.
या आरोग्य शिबिरामध्ये एकूण ५१ जणांची तपासणी करण्यात आली व सर्वांना योग्य मार्गदर्शन देण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनाबद्दल ढुमने लेआउट येथील नागरिकांनी सीएसआर विभागाचे आभार मानले तसेच भविष्यातही अशा जनहिताच्या उपक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की, अशा प्रकारची आरोग्य शिबिरे ग्रामीण भागासाठी अत्यंत लाभदायक ठरतात व समाजातील दुर्बल घटकांना थेट लाभ मिळवून देतात.



