स्वातंत्रवीर सावरकर यांना भारतरत्न पुरस्कार जाहीर करा
सेवानिवृत्त कर्मचारी संघटनाची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
स्वातंत्रवीर विनायक सावरकर यांना केंद्र शासनाद्वारे भारतरत्न पुरस्कार त्वरीत जाहीर करून त्यांच्या स्वातंत्र्यलढा चा गौरव करावा अशी मागणी देऊळगाव राजा सेवानिवृत्त कर्मचारी संघटना च्या वतीने स्वातंत्रवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमात करण्यात आली.
देऊळगाव राजा तालुका सेवानिवृत्त कर्मचारी संघटना, जनसेवा सामाजिक संघटना, सहकार महर्षी स्व भास्करराव शिंगणे सार्वजनिक वाचनालय देऊळगाव राजा, व जेष्ठ नागरिक संघटना यांच्या वतीने विरंगुळा भवन येथे स्वातंत्र्य वीर विनायक सावरकर यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त कर्मचारी संघटना चे अध्यक्ष बळीराम मापारी मामा होते तर प्रमुख पाहुणे म्हणून गोविंदराव अहिरे, प्रकाश खांडेभराड, प्रा विनायक कुळकर्णी होते.
सर्वप्रथम स्वातंत्रवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी प्रकाश अहिरे, प्रा विनायक देशपांडे,शांतीलाल निरफळे, प्रा अशोक डोईफोडे, प्रा विजय रायमल, रमेश नरोडे, घनश्याम भंडारे,बाबुलाल शिवरकर आदी उपस्थित होते.
उपस्थित मान्यवरांनी स्वातंत्रवीर सावरकर यांच्या जीवन कार्यावर प्रकाश टाकला, स्वतंत्र लढ्यात त्यांचे योगदान कसे महत्वाचे होते ते सविस्तर सांगितले, कार्यक्रमाचे संचालन प्रकाश अहिरे यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रा विनायक देशपांडे यांनी मानले.



