ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

राष्ट्रपिता महात्मा गांधी महाविद्यालयात भाषा व सामाजिकशास्त्र संशोधन कार्यशाळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. डॉ. शेखर प्यारमवार

     गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली द्वारा संलग्नित राष्ट्रपिता महात्मा गांधी कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय सावली जिल्हा चंद्रपूर, येथे मानव्यविद्या शाखा व गुणवत्ता हमी कक्ष(IQAC) च्या वतीने विद्यापिठ स्तरीय भाषा व सामाजिकशास्त्र संशोधन कार्यशाळा दिनांक 12मार्च 2025 रोज बुधवारला घेण्यात आली.

या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए चंद्रमौली हे होते तर प्रमुख अतिथीस्थानी प्रा.महानंदा भाकरे, हे होते. सामाजिक शास्त्राचे संशोधन व प्रबंधलेखन या विषयावर साधन व्यक्ती डॉ.अनंत गावंडे उपयोजित अर्थशास्त्र विभाग गोंडवाना विद्यापिठ यांनी मार्गदर्शन केले. तर भाषा व साहित्याचे संशोधन व प्रबंधलेखन या विषयावर साधन व्यक्ती डॉ. रामचंद्र वासेकर यांनी मार्गदर्शन केले.सामाजिक शास्त्राचे संशोधन व प्रबंधलेखन या विषयावर डॉ. अनंत गावंडे यांनी सामाजिक शास्त्राच्या संशोधन कशाप्रकारे करावे . विषय निवड, संशोधनाचे टप्पे , प्रबंधलेखनाची पद्धती यावर सविस्तर मार्गदर्शन केले तर डाॅ रामचंद्र वासेकर यांनी भाषा व साहित्याचे संशोधन यावर विस्तृत मार्गदर्शन केले. डॉ.ऐ.चंद्रमौली यांनीअध्यक्षीय भाषणातून संशोधनाचे महत्त्व सांगून संशोधनाच्या पद्धती व दिशा सांगितल्या या कार्यशाळेचे प्रस्ताविक डॉ. अशोक खोब्रागडे यांनी केले.

संचालन डाॅ. पुंडलिक शेंडे यांनी तर आभार प्रा.प्रियंका बगमारे यांनी मानले. कार्यशाळेच्या यशस्वीतेसाठी डॉ. दिवाकर उराडे, प्रा. प्रशांत वासाडे, प्रा. सगानंद बागडे ,डाॅ. सचिन चौधरी , प्रा.गुरनुले यांनी सहकार्य केले.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये