हेलीपँड विरोधात खंडाळा वासीयांचा तहसिल कार्यालयावर आक्रोश मोर्चा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार
ब्रम्हपुरी:- खंडाळा येथील गट क्रमांक १७२ येथील प्रस्तावित मंजुर हेलीपँड रद्द करण्याबाबत खंडाळा वासीय गावकरी मोठ्या संख्येने ब्रम्हपुरी तहसील कार्यालयावर आक्रोश मोर्चाच्या माध्यमातुन धडकले.
सदर गट क १७२ अतिक्रमण धारक विरुध्द ग्रामपंचायत खंडाळा केस क्र. २०००३४/२०१५ जिल्हा सत्र न्यायालय येथे मागील १३ वर्षांपासून वाद सुरू आहे. सदर गट क्रमांक १७१ व १७२ मधिल अतिक्रमण ग्रामपंचायतीने गावक-याच्या सहकायनि विविध आंदोलने करुन काढले.
तसेच गावक-यांनी वेळोवेळी लोकवर्गणी काढून त्या जागेचे संरक्षण केले आहे. सदर गटामध्ये ग्रामपंचायतीच्या माध्यमातुन रोजगार हमी अंतर्गत वृक्षारोपणाचे काम करावयाचे होते परंतू सदर जागेचा खटला न्यायप्रविष्ट असल्याने प्रस्तावित काम करता येणार नाही व त्यासंबधिची परवानगी तहसीलदार यांनी नाकारली.व वृक्षारोपणाचे काम रद्द करण्यात आला तेव्हापासुनच ग्रामपंचायतीने तेथे कोणतेही काम केले नाही. गट क्र १७२ मध्ये क्रिडांगण तसेच विविध गावविकासात्मक कामे करण्यासाठी ग्रामपंचायत आग्रही आहे.
तसेच स्मशानभुमीच्या शेड चे काम मंजूर झालेले आहे.परंतु खटला न्यायप्रविष्ठ असल्याकारणाने ते सुध्दा रद्द करण्यात आले. ग्रामपंचायत ग्राम विकासाची कामे करण्यास इच्छुक असताना न्यायालयीन खटला न्यायप्रविष्ठ असल्याची बाब शासन वारंवार समोर करून शासनाने त्याच न्यायप्रविष्ठ जागेवर हेलीपँड तयार केलेले आहे. ते कितपत योग्य आहे? सदर जागा जरी महसुल विभागाची असली तरी ती जागा अतिक्रमण धारकांकडुन सोडविण्यासाठी गावक-यांनी अथक परीश्रम केलेले आहेत.
जागेवरील प्रस्तावित हेलीपॅडचे काम नामंजूर करून सदर जागा ग्रामपंचायतिला सुपुर्द करावी. या संबधिचे निवेदन उपविभागिय अधिकारी पर्वनी पाटिल व तहसीलदार सतिश मासाळ यांचे मार्फत मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस,महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे,जिल्हाधिकारी चंद्रपुर यांना पाठविलेले आहेत.निवेदन देताना सरपंच अर्चना डेंगे,उपसरपंच नंदकिशोर राखडे,ग्रा.प.सदस्य अरुन अलोणे,अमरदिप राखडे,प्रदिप माटे,त.मु.अध्यक्ष ईश्वर दिघोेरे,सोमेश्वर मेश्राम,विलास राखडे तसेच मोठ्या संख्येने खंडाळा वासिय गावकरी उपस्थित होते.