Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

“प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान, चंद्रपूर” तर्फे विशेष सेवा पुरस्कार वितरण सोहळा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मुन्ना खेडकर

“प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठान,” चंद्रपूर च्या वतीने प्रतिष्ठानाचे अध्यक्ष तथा माजी खासदार मा. श्री. नरेशबाबू पुगलिया यांच्या पुढाकाराने देश विकासासाठी व समाज उत्थानासाठी महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील विशेष कार्य करणा-या संस्थेला किंवा व्यक्तीला सामाजिक तथा सांस्कृतिक क्षेत्रात सामाजिक बांधिलकी जोपासणा-या व सामाजिक दायित्वाची जाणीव ठेवून समाजात काम करणा-यांना “प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने सन्मानित करण्यात येतो.

यावर्षी सन २०२५ ला प्रथम पुरस्कार वृत्तपत्रांमधून उत्कृष्ठ लिखान करून चंद्रपूर शहराची जीनववाहीणी असलेल्या इरई व झरपट नदीच्या संवर्धन व संरक्षणासाठी जनजागृती केल्याबद्दल वृत्तपत्रांच्या वार्ताहारांना “प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्काराने गौरवान्वित येत आहे.

या सन्मान पुरस्काराचे स्वरूप प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती सन्मान चिन्ह, रोख रक्कम रू. १,११,१११/- ( एक लाख अकरा हजार एकशे अकरा) सन्मान प्रमाणपत्र देण्यात येत आहे.

तसेच व्दितीय पुरस्कार जिल्हा जलसंधारण अधिकारी श्रीमती नीलिमा मंडपे यांना प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती सन्मान चिन्ह, रोख रक्कम रू. ५१,१११/- (ऐक्कावंन हजार ऐकशे अकरा रुपये) सन्मान प्रमाणपत्र सदर पुरस्कार देण्यात येत आहे.

सदर पुरस्कार सोहळा भास्तीय प्रजासत्ताक दिनी २६ जानेवारी २०२५ ला सकाळी ८ वाजून १५ मि. राष्ट्रमाता इंदिरा गांधी यांच्या पूर्णाकृती पुतळा परिसरात प्रियदर्शिनी चौक चंद्रपूर येथे होणार आहे. कार्यकमाचे अध्यक्षस्थानी माजी खासदार मा. श्री नरेशबाबू पुगलिया हे राहणार असून याप्रसंगी माजी मंत्री तथा आमदार मा. श्री सुधिर मुनगंटीवार यांची प्रमुख अतिथी म्हणून उपस्थिती राहणार व यांच्या शुभहस्ते प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती विशेष सेवा पुरस्कार देण्यात येणार आहे. तरी सर्व नागरिकांनी सदर पुरस्कार सोहळ्यास नियोजित वेळेवर उपस्थितीत राहावे. असे आवाहन प्रियदर्शिनी इंदिरा गांधी स्मृती प्रतिष्ठानचे श्री राहुलबाबू पुगलिया यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये