Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

माजी नगरसेवक नरेंद्र पढाल “भोईराज रत्न” पुरस्काराने सन्मानित

आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पार पडले भोई समाजाचे राष्ट्रीय अधिवेशन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

    अखिल भारतीय भोई समाज सेवा संस्थेतर्फे आंध्र प्रदेशातील तिरुपती येथे पार पडलेल्या भोई समाजाच्या राष्ट्रीय अधिवेशनात भद्रावती येथील माजी नगरसेवक तथा भोई समाजाचे शहरातील कार्यकर्ते नरेंद्र पढाल यांना भोईराज रत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.

भोई समाजाच्या शैक्षणिक तथा सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे. नरेंद्र पढाल यांना सदर पुरस्कार प्राप्त झाल्याबद्दल त्यांचे शहरात सर्वत्र अभिनंदन केल्या जात आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये