पुलगाव हद्दीत स्विफ्ट कारसह 7 लाख 64 हजारावर देशी, विदेशी दारू माल जप्त

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
या प्रमाणे आहे की, स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा तर्फे दिनांक 23/01/2025 रोजी मुखबीर कडून मिळालेल्या विश्वसनीय माहितीवरून पो. स्टे. पुलगाव हद्दीत पंच व पो. स्टाफ सह सापळा रचून नाकेबंदी करून प्रो. रेड केला असता यातील आरोपी 1) राजूभाऊ रेस्टॉरंट अँड बार चा चालक – राजेश रघुनाथ भेंडारकर, वय 46 वर्ष, रा कावली (वसाड) तह. धामणगाव (रेल्वे), जिल्हा अमरावती, 2) किरीट गंगाधर कवाडे, वय 32 वर्ष, राहणार दाभाडे, तह. धामणगाव (रेल्वे) जिल्हा अमरावती हे त्याचे ताब्यातील मारुती सुझुकी स्विफ्ट कार क्र. MH 27 DE 4740 मध्ये देशी-विदेशी दारूची वाहतूक करीत असतांना मिळून आले पंचा समक्ष सदर वाहनाची पाहणी केली असता वरील प्रमाणे देशी, विदेशी माल जुमला किंमत 7,64,300/- रु चा माल जप्त करुन त्यांना सदर देशी-विदेशी दारू कुठून आणली याबाबत विचारले असता आरोपी 1) राजूभाऊ रेस्टॉरंट अँड बार चा चालक – राजेश रघुनाथ भेंडारकर, वय 46 वर्ष, रा कावली (वसाड) तह. धामणगाव (रेल्वे), जिल्हा अमरावती, चालवीत असलेल्या राजू भाऊ बार अँड रेस्टॉरंट येथून त्याचे मालक आरोपी 3) राजूभाऊ बार अँड रेस्टॉरंट चा मालक – पवन यादवराव बावरे, राहणार कावली (वसाड) तह. धामणगाव (रेल्वे) जिल्हा अमरावती (पसार) यांचे सांगण्यावरून आरोपी 4) मेहमूद नावाचा इसम राहणार रोहना, तह. आर्वी जिल्हा वर्धा (पसार) यास देण्याकरिता घेऊन आल्याचे सांगितल्याने त्यांचे विरुद्ध पोलीस स्टेशन पुलगाव येथे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला.
मा. अनुराग जैन साहेब, पोलीस अधिक्षक वर्धा, मा. श्री. सागर कवडे साहेब अपर पोलीस अधिक्षक वर्धा, यांचे मार्गदर्शनात – विनोद चौधरी, पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा, पो.हवा. चंद्रकांत बुरंगे, भूषण निघोट, मनिष कांबळे, अमोल नगराळे, प्रफुल पूनवटकर सर्व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा यांनी केली.