Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

सांवगी मेघे पोलीसांकडुन मोटरसायकल चोरीचा गुन्हा उघड

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

दिनांक 21.01.2025 रोजी फिर्यादी आषिश बाबाराव ढोणे रा. सावंगी मेघे यांनी त्याचे सावंगी मेघे दवाखान्याचे गेट क. 3 जवळील त्यांचे कॅफे समोर त्यांचे मालकीची अॅक्टीव्हा मोपेड गाडी क. एम.एच 32 एए 0137 ही ठेवली होती ती कोणत्यातरी अज्ञात ईसमाने चोरून नेली अषा फिर्यादी यांचे तोडी रिपोर्टवरून पो.स्टे सावंगी येथे अप.क. 0024/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. नोंद आहे.

पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील गुन्हे प्रगटकरण पथकाला मुखवीरकडुन खात्रीशिर माहिती मिळाली की, एक ईसम सावंगी ते सालोड रोडवरील सैनी हॉटेलजवळ गुन्हयातील चोरीस गेलेली मोपेड गाडे घेवून आहे अषा माहितीवरून आरोपी नामे संदीप दिनकर मुंगले वय 51 वर्ष रां संत चोखोबा वार्ड हिंगणघाट ता.जि.वर्धा यांना ताब्यात घेवून त्याचेकडून पो.स्टे. सावंगी मेघे येथील गुन्हयात चोरीस गेलेली 1) अॅक्टीव्हा मोपेड गाडी क. एम.एच 32 एए 0137 किं. 15,000/ रू. ची जप्त करण्यात आली. तसेच त्यास अधिक विचारपुस करून त्याचे ताब्यातून गुन्हया व्यतीरीक्त पो.स्टे. सावंगी मेघे परीसरातून चोरलेली 2) मोपेड गाडी क. एमएच 32 वाय 3326 किं. 70,000/रू. व 3) प्लेजर मोपेड क. एमएच 32 ए.एन 7355 किं. 55,000/रू. 4) होंडा डिओ मोपेड क. एम.एच 31 डी.एच 3383 किं, 70.000/ रू. 5) सुझुकी ऐसेस क. एमएच 31 डी. क्यु 9739 किं. 60,000/रू. 6) अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच 32 ए.टी 4411 किं. 75,000/ रू. एकुण जु.किं. 3,45,000/रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून आरोपी जवळ ईतर गाड्यांच्या भरपुर चाब्या मिळून आल्या असून जप्त केल्या आहेत.

नमुद जप्त अॅक्टीव्हा मोपेड गाडी 1) गाडी क. एम.एच 32 एए 0137 ही गाडी पो.स्टे सावंगी गुन्हा क. अप.क. 0024/2025 कलम 303(2) भा.न्या.सं. मधील असून 2) मोपेड गाडी क. एमएच 32 वाय 3326 हो गाडी पो.स्टे. हिंगणघाट येथील अप.क. 121/25 कलम 303(2) भा.न्या.सं. अन्वये चे गुन्हयातील आहे. तसेच ३) प्लेजर मोपेड क. एमएच 32 ए.एन 7355 व 6) अॅक्टीव्हा मोपेड क. एम.एच 32 ए.टी 4411 या गाड्यांचे मालकांचा शोध घेण्यात आला. गाडीचे मालक वैद्यकीय शिक्षण घेत असून बाहेरगावी आहे. त्यामुळे त्यांनी तकार दिलेली नाही. तसेच उर्वरीत दोन वाहने 4) होंडा डिओ मोपेड क. एम्.एच 31 डी.एच 3383 व 5) सुझुकी ऐसेस क. एमएच 31 डी.क्यु 9739 यांचे मालकांचा शोध घेणे सुरू आहे. गुन्याचा तपास सुरु आहे. आरोपीकडून आणखी गाड्या मिळून येण्याची दाट शक्यता असल्याने त्या अनूशंगाने पुढील तपास करण्यात येते.

सदरची कार्यवाही ही मा. पोलीस अधीक्षक अनुराग जैन साहेब, अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे साहेब, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेष्वर साहेब, यांचे मार्गदर्शनात सहा. पोलीस निरीक्षक श्री संदिप कापडे सा, ठाणेदार पोलीस स्टेशन सावंगी मेघे यांचे निर्देशाप्रमाणे गुन्हे प्रकटीकरण पथकातील पोलीस अंमलदार पो.हवा सतिश दरवरे, पोहवा संजय पंचभाई, पोहवा अनिल वैद्य, निलेष सडमाके, कॉन्स्टेबल निखील फुटाणे, अमोल जाधव, यांनी केली. पुढील तपास पोहवा संजय पंचभाई हे करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये