श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप तर्फे कालेश्वर दौरा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गडचांदूर :- श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूर तर्फे नुकतेच आध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्र राज्याच्या टोकावर असलेल्या आणि तेलंगणा राज्यातील सुप्रसिद्ध अशा कालेश्वर येथिल मंदिराला भेट देऊन दर्शन घेतले या निमित्ताने मंदिरात पूजा अर्चा केली यापूर्वी सुध्दा ग्रुप च्या वतीने विविध धार्मिक स्थळाना भेट दिली होती राजुरा तालुक्यातील देवाडा येथील सुप्रसिद्ध सिद्धेश्वर मंदिराला सुध्दा भेट देऊन दर्शन घेतले.
सामाजिक, शैक्षणिक व धार्मिक दायित्व स्वीकारून या ग्रुप तर्फे यापूर्वी सुध्दा विविध उपक्रम घेण्यात आले श्री संत गजानन महाराज इव्हनिंग वॉक ग्रुप गडचांदूरचे अध्यक्ष सेवानिवृत्त उपप्राचार्य विजय आकनुरवार,उपाध्यक्ष सेवानिवृत्त प्राचार्य कृष्णा बतुलवार,केन्द्र प्रमुख संजय त्रिपतिवार, ब्राईट इंग्लिश मीडियम स्कूलचे अध्यक्ष जगदीश ठावरी, जीप शिक्षक श्री रामकृष्ण नागरगोजे यांनी या दौऱ्यात सहभागी झाले होते