गुरुकुल महाविद्यालय, नांदा येथे ग्रंथ प्रदर्शनचे आयोजन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
गुरुकुल कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, नांदा येथे दिनांक 15 जानेवारी 2025 रोजी रासेयो व ग्रंथालय विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तथा उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या उपक्रमाचा भाग म्हणून ग्रंथ प्रदर्शन आयोजित करण्यात आले.
या ग्रंथ प्रदर्शनीचे उद्घाटन वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव डॉ. अनिल मुसळे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी प्रभारी प्राचार्य आशिष पैनकर, रासेयो कार्यक्रम अधिकारी डॉ. प्रशांत पुराणिक, ग्रंथपाल प्रा. सचिन कर्णेवार, प्रा. नीता मुसळे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
सदर प्रदर्शनात स्पर्धा परीक्षा, आत्मचरित्र, चरित्र ग्रंथ, विश्वकोश व विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्वाला चालना देणाऱ्या विविध पुस्तकांचे प्रदर्शन करण्यात आले. गुरुकुल महाविद्यालयाचे विद्यार्थी, प्रभू रामचंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी या ग्रंथ प्रदर्शनाचा लाभ घेतला.