Breaking NewsBusiness NewsCelebrityEntertainmentFashionsHealth & EducationsPoliticsSportsToday's Marketकृषी व व्यापारक्रीडा व मनोरंजनग्रामीण वार्ताताज्या घडामोडीदेश विदेशफिल्मी दुनियामहाराष्ट्रराजकीय

अवैद्य रेती वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले : महसूल विभागाची बेधडक कारवाई

एका आठवड्यात चौथी कारवाई : तहसीलदार राजेश भांडारकर ॲक्शन मोडवर

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

      सध्या रेती घाटाचे लिलाव बंद आहे, त्यामुळे वाळू माफिया यांनी रेती तस्करीचा गोरख धंदा सुरू केलेला आहे. तालुक्यात होत असलेल्या अवैध गौण खनिज वाहतुकीला आळा बसावा या उद्देशाने तहसीलदार राजेशभांडारकर यांनी मोहीम सुरू केली आहे. त्या अंतर्गत गौण खनिजपथकाद्वारे कारवाईचे सत्र सुरू केले आहे.

यात मंगळवार दिनांक 14 जानेवारी रोजी रात्री 9.00 वाजता भद्रावती तालुक्यातील पारोधी गावातील उंबर घाटतील अवैद्य रेतीचे ट्रॅक्टर नाल्यातून रेती उपसा करत असल्याचीगोपनीय माहिती महसूल विभागाला मिळाली. माहिती मिळताच गौण खनिज शोध पथक यांनी उंबरघाट येथे धडक दिली. यावेळी घाटात तीन ट्रॅक्टर रेती भरतांना आढळुन आले त्यातील दोन ट्रॅक्टर पळुन गेले असुन एक ट्रॅक्टर रेती भरलेलेनाल्यात फसल्याने त्याला पकडण्यात आले.

गावातील ट्रॅक्टरच्या सहाय्याने गावकऱ्यांच्या मदतीने अवैध रेती भरलेले ट्रॅक्टर काढण्यात आले असुन तहसील कार्यालय भद्रावती प्रांगणात लावण्यात आले आहे. गेले अनेक दिवसापासून भद्रावती तालुक्यातील अवैध रेतीची तस्करी करणाऱ्यां वाळू माफियांनीउच्छाद मांडला आहे एक ब्रास रेतीची कारवाई तहसीलदार राजेश भांडारकर यांच्या नेतृत्वात गौण खनिज शोधपथक मंडळ अधिकारी समीर वाटेकर, तलाठी अनिल दडमल, तलाठी खुशाल मस्के, तलाठी भिसीकर यांनी केली आहे.

सदर ट्रॅक्टर मालक मारुती गायकवाड यांचे मालकीचे असून ते राहणार वायगाव (कुरेकार) इथले असल्याचे सांगण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये