ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विठुरायाच्या भाविक भक्तांना घुग्घूस पोलीस स्टेशन तर्फे फरारी चिवडा व पाणी वाटप

चांदा ब्लास्ट

आषाढी एकादशी निमित्त विदर्भातील छोटा पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या तीर्थक्षेत्र वढा येथे गांधी चौक येथून पोलीस स्टेशन मार्गे पायदळ वारीत जाणाऱ्या सर्व भाविक भक्तांना घुग्घूस पोलीस स्टेशन तर्फे फरारी चिवडा व पाणी वाटप करण्यात आले.

सन २०२२ पासून देवशयनी आषाढी एकादशी निमित्त घुग्घूस येथील गांधी चौकातून पायदळ वारी निघत आहे. आज गुरुवारी तीर्थक्षेत्र वढा येथे जाण्यासाठी पायदळ वारी निघाली या वारीत शेकडो भाविक भक्त सहभागी झाले. प्रत्येकाला विठुरायाच्या दर्शनाची ओढ लागली होती दुपारी १२.३० वाजता पायदळ वारी मार्गस्थ झाली टाळ, मृदंगाच्या गजरात व भजनाच्या तालावर भाविक भक्त नाचत होते सोबत लेझीम पथक होते. पोलीस स्टेशन जवळ पायदळ वारी येताच पोलिसांनी भाविक भक्तांना फरारी चिवडा व पाणी बॉटल वाटप केले. तसेच ठाणेदार शेख यांनी कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पायदळ वारी सोबत पोलिसांना पाठविण्यात आले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये