Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

देऊळगाव राजा येथे 35 वर्षीय इसमाचा मृतदेह आढळला 

मर्ग दाखल  

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

 देऊळगाव राजा शहरातील सिव्हिल कॉलनी भागात राहणाऱ्या 35 वर्षीय इसमाला फिर्यादी आणि त्याच्या नातेवाईकांनी स्थानिक ग्रामीण रुग्णालयात मृत अवस्थेमध्ये आणून भरती केले. फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस ठाण्यात मर्ग दाखल करण्यात आला आहे.

 सविस्तर वृत्त असे की ग्रामीण रुग्णालयातील फिर्यादी कक्ष सेवक देवानंद बबन घुगे. यांनी देऊळगाव राजा पोलिसांना दिलेल्या मेमो वरून सिव्हिल कॉलनी भागात राहणाऱ्या मृतक ऋषिकेश सखाराम खांडेभराड वय 35 वर्ष यांना मृत अवस्थेमध्ये मृतकाचे नातेवाईक राजाराम लक्ष्मण खांडेभराड यांनी ग्रामीण रुग्णालयात आणून भरती केले परंतु दवाखान्यातच भरती करण्यापूर्वी वरील इसमाचा मृत्यू झाला होता.

सदर इसमाने गळफास लावून आत्महत्या केल्याची चर्चा देऊळगाव राजा शहरात आहे. याप्रकरणी फिर्यादी कक्षसेवक यांनी दिलेल्या फिर्यादीवरून देऊळगाव राजा पोलीस स्टेशनला मर्ग दाखल करण्यात आला असून घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल देवी चंद चव्हाण करीत आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये