Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

श्रींच्या पुरातन अलंकारांना दिली सुवर्णकारांनी झळाली

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

देऊळगाव राजा शहरात शेकडो वर्षांपूर्वीचे श्री बालाजी महाराजांचे मंदिर असून या ठिकाणी दरवर्षी घटस्थापनेपासून यात्रा महोत्सवाला प्रारंभ होत असते, दोन महिने चालणारा हा उत्सव संपूर्ण भारत वर्षात कुठेच साजरा केल्या जात नाही या मंदिरातील श्री बालाजी महाराजांच्या अंगावरील पुरातन सुवर्ण अलंकारांना दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी शहरातील सुवर्णकाराकडून झळाळी देण्यात येते आज दिनांक 3 ऑक्टोबर 24 रोजी श्री संस्थांनचे वतीने श्रींच्या मूर्तीवरील सुवर्ण अलंकार व चांदीचे भांडे हे उजवण्यासाठी शहरातील सुवर्णकारांना देण्यात आले.

मंदिरातच या सर्व सुवर्णकारांनी सेवा म्हणून सर्व सुवर्ण अलंकार व चांदीचे भांडे उजळून दिले यामध्ये कर्णफुल, पुतळ्याची माळ, बोरमाळ, पाचू, कंबरपट्टा, चौदा फुले, टोप, पताकाचा, समावेश होता या सुवर्ण अलंकारांनाझळाळी देण्याचा मान परंपरेनुसार येथील सुवर्णकारांना देण्यात आलेला आहे यामध्ये चंद्रकांत वालेकर,जगदीश दहिवाळ, चंद्रकांत टेंभुरकर, सतीश पंचदाने, वसंतराव शेंदुरकर,सुनील काटकर, गजानन पिंपळगावकर यांनी यासाठी परिश्रम घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये