Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पेपर मिल रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न

राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदानाचे औचित्य ; सेल्फ हेल्प ग्रुप व मित्रमंडळाचा पुढाकार

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर. ता.०१:- राष्ट्रिय स्वैच्छिक रक्तदानाचे औचित्य साधून बल्लारपूर पेपर मिल रुग्णालयात रक्तदान शिबिर संपन्न झाले. दि.०१ ऑक्टोंबर रोजी सकाळी १० ते ५ या वेळात घेण्यात आले होते. सेल्फ हेल्प ग्रुप (सोसायटी)व मित्रमंडळाच्या वतीने आयोजित या रक्तदान शिबिरात ३२ रक्त दात्यानी रक्तदान केले.

        सामाजिक उपक्रमातून सुरू करण्यात आलेल्या सेल्फ हेल्प ग्रुप (सोसायटी) व मित्रमंडळाच्या राष्ट्रिय स्वैच्छिक रक्तदानाचे औचित्य साधून बल्लारपूर पेपर मिल रुग्णालयात रक्तदान शिबिरवतीने दरवर्षी विविध सांस्कृतिक, क्रिडा स्पर्धा आणि समाज उपयोगी उपक्रम राबविले जाते. त्याचाच एक भाग म्हणून मंगळवार ०१ ऑक्टोंबर रोजी राष्ट्रिय स्वैच्छिक रक्तदानाचे औचित्य साधून बल्लारपूर पेपर मिल रुग्णालय येथे रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले. यावेळी ३२ रक्तदात्यांनी रक्तदान केले. प्रमुख मान्यवरांच्या हस्ते सर्व रक्तदात्यांना प्रशस्ती देऊन गौरविण्यात आले. या शिबिराचे उद्घाटन पेपर मिल एच.आर विभागाचे उप व्यवस्थापक अजय दूरगकर, डॉ. भालेराव आणि डॉ. अनुप बांगडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

यावेळी बल्लारपूर पेपर मिल मजदुर सभेचे नेते रामदासजी वागदकर, वीरेंद्र आर्य, गजानन दिवसे, माथनकर, सुदर्शन पुल्ली, अनिल तुंगीडवार या मान्यवरांची उपस्थिती होती. रक्तदान शिबिर यशस्वीेतेसाठी सेल्फ हेल्प ग्रुप (सोसायटी) चे अध्यक्ष संतोष आत्राम, सचिव अनुप संधू, उपाध्यक्ष अजय शहा, कोषाध्यक्ष सावन पेरके, सहसचिव जोगेश्वर खानोरकर यांच्यासह संस्थेच्या बहुसंख्य सदस्यांचा सहभाग होता. यावेळी रुग्णालयातील डॉक्टर, कर्मचाऱ्यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये