Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

गांगलवाडी -व्याहाड रस्ता बांधकाम व ब्रम्हपूरीतील भुमीगत गटार बांधकामाचे भूमिपूजन

विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांची राहणार प्रमुख उपस्थिती

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्रात दर्जेदार रस्ते तयार व्हावे सोबतच विविध विकासकामे पुर्णत्वास यावी यासाठी महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्षनेते तथा ब्रम्हपूरी विधानसभा क्षेत्राचे आमदार विजयभाऊ वडेट्टीवार हे सदैव तत्पर असुन त्यांच्या विशेष प्रयत्नांतुन मंजूर विकासकामांचे भूमिपूजन 4 आॅक्टोंबर रोजी पार पडणार आहे.

महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान अभियान अंतर्गत मंजूर 130 कोटी रुपयांच्या ब्रम्हपूरी शहरातील भुमीगत गटार बांधकाम होणार आहे. त्यांचे भुमीपुजन दि. 4 आॅक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता ब्रम्हपूरी शहरातील शिवाजी महाराज चौक येथे संपन्न होणार आहे. तर महाराष्ट्र राज्य पायाभूत विकास महामंडळाअंतर्गत 262 कोटी रुपयांच्या निधीतून मंजुर गांगलवाडी-निफंद्रा-व्याहाड रस्ता बांधकामाचे भुमीपूजन हळदा येथील ज्ञानगंगा विद्यालयात दि. 4 आॅक्टोंबर रोजी दु. 12 वा. होणार आहे. यावेळी खासदार डॉ नामदेव किरसान यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी या भुमीपुजन सोहळ्याला नागरिकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन तालुका व शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये