Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

कोल वेतन वाढीसाठी कामगारांचे चार तास आंदोलन

जिल्हा अधीकारी कार्यालयात बैठक घेण्याचे आश्वासनानंतर आंदोलन मागे

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे

         कर्नाटक ऐम्टा कामगारांचे गेल्या चार वर्षापासून केपीसीएल खाणीचे व्यवस्थापन व त्याची सहयोगी बरांज कोल माईन्स हे शोषण करत असून वेतन वाढीच्या निवड भूल-थापा देत आहे. मात्र अजूनही कोल वेतनात एकही रुपयाची वाढ केली नाही त्यामुळे इतर मागण्या घेऊन कामगारांनी आज दिनांक ३ ऑक्टोंबर ला केपीसीएल कोळसा खाणीचे उत्पादन बंद करून तब्बल चार तास खान बंद करून आंदोलन केले. कंपनी व पोलीस प्रशासन यांनी मध्यस्थी करून दि ८ ऑक्टोबरला जिल्हाधीकारी कार्यालयात तोडगा काढू या आश्वासना नंतर आंदोलन मागे घेतले.

कर्नाटक एम्टा खान कामगारांना वेज बोर्ड लावण्यात यावा कामगारांना सेफ्टी शूज, रेष शेल्टर, सेफ्टी गॉगल, पिण्यासाठी शुद्ध पाणी, मुलांसाठी स्कूल बस, २४ तास कामगारांसाठी उपचार केंद्र, वार्षिक बोनस, घर किराया या इतर मागण्यासाठी गेल्या चार वर्षापासून कामगार लढा देत आहे या मागण्यासाठी चार वर्षात केपीसीएल कंपनी सोबत चाळीस बैठका झाल्या मात्र त्या विफल ठरल्या या करता आज दि ३ ऑक्टोबरला केपीसीएल खुल्या कोळसा खाणीत खान बंद आंदोलन पुकारले.

आंदोलनाच्या चार तासा नंतर कंपणीचे अधीकारी यांनी पत्र देउन या मागण्या संदर्भात दि ८ ऑक्टेबरला जिल्हाधीकारी कार्यालयात बैठक घेण्यात येणार असल्याचे आश्वासन दिले मात्र या बैठकीत तोडगा निघाला नाही तर ९ ऑक्टोबर पासुन पून्हा आंदोलन करण्यात येणार असल्याचा ईशारा कामगारानी दिला. या आंदोलनात अरविंद देवगड, विनोद आगलावे, प्रदीप मानकर, सुभाष गेडाम, महेश पेटकर, पांडुरंग सातपुते अशोक ठेंगणे, शंकर बालपने, महेश तुंबडे, रवींद्र निखाड, विलास ताजने सह असंख्य कामगार उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये