Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विश्वशांती विद्यालयात महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची जयंती साजरी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावली द्वारा संचालित विश्व शांती विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय सावली येथे सत्य व अहिंसेचे पुजारी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची १५५ वी जयंती आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांची संयुक्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.

सर्वप्रथम राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेला उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सुतमाला आणि दीप प्रज्वलन करून अभिवादन करण्यात आले..त्यानंतर विद्यालयाचे शिक्षक शेखर प्यारमवार आणि त्यांच्या संचांनी महात्मा गांधी यांना आवडत असलेले भजने सादर केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भारत शिक्षण प्रसारक मंडळ सावलीचे सचिव राजाबाळ पाटील संगिडवार हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून विद्यालयाचे मुख्याध्यापक रवींद्र मूप्पावार,पर्यवेक्षक मधुकर जाधव,संजय ढवस,संगिडवार उपस्थित होते.

कार्यक्रमाचे संचालन श्वेता खर्चे तर आभार सुधीर जीवतोडे यांनी मानले.कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी रामचन्द्र खिरटकर,दामोधर आदर्लावार नंदू भंडारे,संजय भोयर,सुरेंद्र डोहने,यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये