Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलीसांना मारहाण करणे व कर्तव्यात अडथळा निर्माण करणे पडले महागात!

आरोपीस सश्रम कारावास व दंड जिल्हा सत्र न्यालयाचा निवाडा!

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा- जिल्ह्यातील कारंजा पोलीस ठाण्याचे कर्मचारी आपले कर्तव्य बजावत असताना आरोपी दिलीप जगन्नाथ रेवतकर वय वर्ष 48 रा. बिहाडी ता.कारंजा जि. वर्धा याने पोलीसांच्या कर्तव्यात जाणूनबुजून अडथळा निर्माण करत अश्लिल भाषेत शिवीगाळ करत पोलीस कर्मचाऱ्या गालावर थापडा मारल्या वर रुगणालयात सुद्धा आरोपीस वैदयकीय तपासणी करीता आणले असता,

वारंवार पोलीस कर्मचाऱ्यांचा अंगावर धावून जाणे वाद घालत अरेरावी केली असता पो.ह.वा. विनोद वानखेडे यांच्या तक्रारीवरून अधिकाऱ्यांनी अ.प क्र.242/19 कलम 353,332, 186,294,506 भा.द.वि.सह 110/117 मु.पो.का.नुसार दोषारोपपत्र न्यालयात दाखल केले असता सरकार तर्फे एकूण 13 साक्षीदार तपासले ज्यात फिर्यादी व प्रत्यक्षदर्शी खंबीर साक्षीदारांची साक्षी वरून व सबळ पुरावा या वरून सा. जिल्हा सत्र न्यायाधीश -04 यांनी आरोपीस कलम 353 भा.दं.वि अंतर्गत 02 वर्ष सश्रम कारावास व 15000 रूपये दंड दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास, कलम 332 भा.दं.वि. नुसार 2 वर्ष सश्रम कारावास व 15000 रूपये दंड, दंड न भरल्यास 3 महिने सश्रम कारावास, कलम 294 भा.दं.वि अंतर्गत 3 महिने सश्रम कारावास व 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 आठवडा साधा कारावास तर कलम 110/117 मु.पो.का. अतंर्गत 500 रुपये दंड व दंड न भरल्यास 1 आठवडा साधा कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली.

यावेळी सरकार तर्फे सरकारी वकील एच. पी. रणदिवे यांनी कामकाज केले तर पैरवी अधिकारी म्हणून अशोक सोनटक्के यांनी काम पाहिले

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये