शिवणी (चोर) येथे बिरसा मुंडा जयंती साजरी

चांदा ब्लास्ट
जय सेवा आदिवासी मंडळ आणि ग्रामस्थ शिवनी चोर यांच्या संयुक्त विद्यमाने आदिवासी जननायक बिरसा मुंडा यांची जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. जयंतीच्या निमित्ताने गावातून मिरवणूक काढण्यात आली तत्पूर्वी कुवारा भिवसन भीमाल पेनठाणाची पूजा करून बौद्धिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले . या कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबाकर मडावी होते. प्रमुख वक्ते म्हणून बंडू टेकाम गुरुजी होते. तर ग्रामपंचायत सरपंच श्री रवींद्र पहानपटे, पोलीस पाटील गणेश भोयर, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मधुकर पाहानपटे यांची प्रमुख उपस्थिती होती. याप्रसंगी श्री. टेकाम गुरुजी यांनी बिरसा मुंडा यांच्या जीवन कार्यावर समायोचित विचार व्यक्त करून आदिवासी समाजाच्या विविध समस्या आणि विकासाच्या दृष्टीने विचार व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गावातील सर्व स्त्री पुरुष यांनी अथक परिश्रम घेतले. बल्लारपूर येथील सौ. कल्पना कोडापे आणि त्यांची चमू यांचे विशेष सहकार्य लाभले. सुभाष कोडापे, रवी गेडाम, चंदा मडावी, सरला मडावी,अंजली मडावी, लक्ष्मी कोहचाडे, कांताबाई मडावी, सोनी मडावी, शशिकला मडावी, सरस्वती कोडापे, रेखा कोडापे, सिंधू मडावी, अनिता मडावी, शितल मडावी, सीमा गेडाम, गिरजा कोडापे आदींचे सहकार्य लाभले. सूत्रसंचालन विद्या मडावी यांनी केले तर आभार प्रदर्शन शीला कोयचाडे यांनी केले.



