देऊळगाव राजा नगर परिषद मध्ये आजी व माजी आमदार यामध्ये काट्याची लढत
नगराध्यक्ष पदासाठी त्रिकोणी संघर्ष

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
बालाजी महाराज यांच्या पुण्यनगरी देऊळगाव राजा येथे नगर परिषद निवडणूक अतिशय चुरशीची होत असून विद्यमान आमदार मनोज कायंदे यांच्या विरोधात माजी आमदार डॉ. राजेंद्र शिंगणे व डॉ. शशीकांत खेडेकर यांनी आघाडी तयार करून मोठे आव्हान उभे केले आहे, काँग्रेस व शिवसेना ऊ बा ठा एकत्रित येऊन लढत आहे.
नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट व भाजप युती च्या माधुरी शिपणे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार व शिंदे सेने च्या नेहा सुनगत व उद्धव सेना व काँग्रेस पक्षाच्या शोभा कासारे यांच्यात काट्याची लढत होत आहे,
अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी नगराध्यक्ष पदाच्या 9 आणि नगर सेवक पदाच्या 45 उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असल्याने सदस्य पदासाठी 77 उमेदवार रिंगणात आहे.
अध्यक्ष पदाच्या तिन्ही महिला उमेदवारांनी प्रचार सुरू केला असून मतदारांच्या घरोघरी जाऊन भेटी घेत असल्याचे दिसून येत आहे, नगरसेवक पदासाठी उभ्या असलेल्या उमेदवारांनी सुद्धा प्रचार सुरू केला आहे.
देऊळगाव राजा नगर परिषद मध्ये एकूण 29,326 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, यात पुरुष मतदारांची संख्या 14,884 आहे तर महिला मतदारांची संख्या 14,442 एवढी आहे.25 नोव्हेंबर रोजी चिन्ह वाटप होणार असून त्यानंतर प्रचाराला वेग येणार आहे,



