ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शेतीसाठी पाणी मिळत नसल्याने शेतकऱ्यांनी केले रस्ता रोको आंदोलन 

२५ ते ३० शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

गोसेखुर्द उजवा कालवा प्रकल्पाच्या क्रिटिकल पॅच व इतर भागातील बांधकाम शिल्लक असल्याच्या कारणावरून पाटबंधारे विभागाने उन्हाळी धान पिकास पाणी देण्यास नकार दिला. या प्रकाराने संतापलेल्या शेतकऱ्यांनी काल दिनांक 21 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता च्या सुमारास शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात सिंचन कार्यालयास कुलूप ठोकून रस्त्यावर उतरून ठिय्या आंदोलन केले.

उन्हाळी हंगामातील धान पिकासाठी पाणी मिळावे यासाठी लाभक्षेत्रातील ५६ पाणी वापर संस्थेच्या वतीने १३ नोव्हेंबर २०२५ रोजी गोसीखुर्द उजवा प्रकल्पाच्या सायगाटा कार्यालयासमोर आंदोलन केले होते त्यावेळी पाटबंधारे विभागाने २० नोव्हेंबर पर्यंत वेळ मागून घेतला होता त्यामुळे शेतकऱ्यांनी आंदोलन स्थगित केले होते.

मात्र पाटबंधारे विभागाच्या गोसेखुर्द उजवा कालवा विभागाने एका पत्राद्वारे गोसेखुद प्रकल्पाच्या क्रिटिकल पॅच व इतर भागातील बांधकाम करावयाची आहे असे कारण देऊन पाणी देण्यास नकार दिल्या त्यामुळे संकल्प शेतकऱ्यांनी सायगाटा कार्यालयासमोरील नागभीड – ब्रह्मपुरी राष्ट्रीय महामार्ग अडवून धरला त्यानंतर शेतकऱ्यांनी सायगाटा येथील सिंचन कार्यालयास कुलूप ठोकले. शेतकरी नेते कॉम्रेड विनोद झोडगे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय महामार्ग रोखून धरला जोपर्यंत अधिकारी येत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावर बसू अशी ठाम भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली त्यावेळेस एस एन मोरे कार्यकारी अभियंता घोडाझरी यांनी आंदोलन कर्त्याचे म्हणणे ऐकून घेतले.

मात्र शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य करण्यास ते असमर्थ ठरले. शेतकऱ्यांच्या रास्त मागन्या साठी राष्ट्रीय महामार्ग अडवल्याने काही काळ वाहतुकीची कोंडी निर्माण झाली होती पोलिसांनी २० ते २५ शेतकऱ्यांना ताब्यात घेऊन अटक केली व काही वेळानंतर सुटका केली तर १५ ते 20 लोकांवर गुन्हे नोंदविण्यात आले. या आंदोलनात ब्रह्मपुरी नागभीड व सावली तालुक्यातील लाभ क्षेत्र गावातील नागरिक महिला मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळेस जोपर्यंत आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन करीतच राहू अशी ठाम भूमिका आंदोलन कर्त्यांनी घेतली. तसेच पुढील आंदोलन नागपूर विभागीय सिंचन कार्यालयाला घेराव घालण्याचा इशारा देण्यात आला.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये