स्वतःची सुरक्षा बाळगत ऊत्पादनाचे ऊदीष्ट गाठा : क्षेत्रीय महाप्रबंधक डे
बेलोरा-नायगाव खाणीत सुरक्षा पंधरवाड्याची सांगता

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अतुल कोल्हे
खाणीत काम करीत असताना प्रत्येक कामगाराने सुरक्षेचे नियम पाळून स्वतःची व इतरांची सुरक्षा बाळगत ऊत्पादनाचे ऊदीष्ट गाठण्याचे आवाहण वणी वेकोली क्षेत्राचे क्षेत्रीय महाप्रबंधक स भ्यासाची डे यांनी कामगारांना केले.बेलोरा-नायगाव कोळसा खाणीत सुरक्षा पंधरवाड्याची सांगता करण्यात आली.याप्रसंगी ते बोलत होते.
यावेळी क्षेत्रीय महाप्रबंधक सभ्यासाची डे, नीलजाई उपशेत्रीय प्रबंधक जुळपिकार अन्सारी, खान प्रबंधक संदीप वागले, जीवीएस प्रसाद रमेश साहू प्रदीप जंगाडे ,संजय वेमीनेनी नवीन जैन ,दिनेश कुमार हंस, प्रभाकर बघेल, दिलीप मुटपल्लीवार ,केके पांडे आधी उपस्थित होते.सुरक्षा मशाल प्रज्वलित करुन व कालीमातेचे पुजन करुन सदर सुरक्षा पंधरवाड्याची सुरुवात करण्यात आली.यावेळी झेंडावंदन करुन कामगारांना सुरक्षेची शपथ देण्यात आली.खाणीतील सुरक्षा विषयाच्या साहित्याचे परीक्षण करण्यात आले.पंधरवाड्यादरम्यान कामगारांना प्रात्यक्षिकासह सुरक्षेचे धडे देऊन त्यांना मार्गदर्शन करण्यात आले.त्याचबरोबर सुरक्षेसंबंधीत अन्य कार्यक्रम घेण्यात आले.
कार्यक्रमाचे संचालन शिवम यांनी तर आभार अनील बोरडे यांनी मानले. कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी संकेत खोकले,सुनील बिपटे, प्रज्ञावंत लोणारे,निलेश बारचने,निखील दुर्गे,अक्षय धोबे,मारोती बुरकुटे प्रफुल विखारे आदींनी सहकार्य केले.



