Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

शासकीय औ. प्र. संस्थेत गांधी जयंती निमित्ताने स्वच्छता सेवा सप्ताह साजरा 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

     शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त स्वच्छता सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. दि. 2 आॅक्टोबर पर्यंत चाललेल्या या सप्ताहाअंतर्गत संस्थेच्या परिसरात प्राचार्य राजरतन वानखेडे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षणार्थांनी स्वच्छता केली तसेच पंप मेकॅनिकच्या प्रशिक्षणार्थांनी वाटर सरक्युलेशन सिस्टीम दुरूस्तीचे काम केले.

याकरिता सर्व व्यवसायाच्या प्रशिक्षणार्थांनी, गटनिदेशक व निदेशकांनी विशेष परिश्रम घेतले. महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या संयुक्त जयंती कार्यक्रमाचे आयोजन संस्थेच्या कार्यालयात करण्यात आले.

यावेळी रासेयो कार्यक्रम अधिकारी बंडोपंत बोढेकर, गटनिदेशक श्री. जितेंद्र टोंगे, एन.एन. गेडकर, हितेश नंदेश्वर तसेच निदेशक वर्ग आदींची उपस्थिती होती. सूत्रसंचालन अभय घटे यांनी केले तर आभार प्रदर्शन संकेत पोहनकर यांनी केले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये