Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे यांचे कार्य ऊर्जादाई – डॉ.अभ्युदय मेघे 

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त प्रतिपादन

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

अण्णाभाऊ साठे यांचे कार्य आजच्या तरुणाईला एक वेगळी ऊर्जा देणारे आहे. अवघ्या चौथा वर्ग शिकलेला माणूस त्याची कादंबरी अगदी रशियापासून तर तिकडे संपूर्ण जगभर प्रसिद्ध आहे. अण्णाभाऊ साठे यांना साहित्यरत्न ही विशेष उपमा दिली जाते. त्यांचं खूप मोठं कार्य हे साहित्य क्षेत्रात आहे. असे प्रतिपादन डॉ.अभ्युदय मेघे यांनी सिंधी मेघे येथे आयोजित लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने केले.यावेळी अमित ठाकूर,सुमित गांजरे माजी ग्रामपंचायत सदस्य प्रमोद खंडारे उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या सिंधी स्थित पूर्णाकृती पुतळ्याला हार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांचे स्वागत करून मान्यवरांचे भाषण पार पडले.

या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उमेश बावणे, विकी बावणे, प्रवीण पोटफोडे, गजू भेंडे, देवेंद्र भेंडे,यश भेंडे, मीना भेंडे, हिराबाई भेंडे, प्रवीण खडसे, दिलीप वानखेडे,वैशाली भेंडे,सारिका भेंडे,भाऊराव मुंगले,देवेंद्र डोके,मधुकर बावणे, सर्वोच्च ताकतोडे शुभम डोके दिनेश लोहकरे,शरद भगत, संजय मांडोळे, लालचंद चंदनखेडे यांचे सहकार्य लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये