Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त आरोग्य संकल्प अभियानाचे- डॉ.अभ्युदय मेघे यांनी संकल्पना 

ग्रामपंचायत नालवाडी येथे आयोजन ; आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे उपक्रम

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालय सावंगी मेघे व ग्रामपंचायत नालवाडी यांच्या संयुक्त विद्यमानाने लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीच्या निमित्ताने आरोग्य संकल्प अभियानाचे आयोजन ग्रामपंचायत कार्यालय नालवाडी येथे करण्यात आले होते.

या कार्यक्रमाला आचार्य विनोबा भावे ग्रामीण रुग्णालयाचे विशेष कार्यकारी अधिकारी डॉ.अभ्युदय मेघे , नलवाडी ग्रामपंचायतच्या माजी सरपंच प्रतिभा माऊसकर,माजी सरपंच लता टेकाम, माजी उपसरपंच प्रज्ञा चाहांदे,उपसरपंच महेश शिरभाते,ग्रा.सदस्य रीता बनकर,वैभव सूर्यवंशी,अमोल मानकर,बंटी खडसे,सागर सबाने, माजी पंचायत समिती सदस्य बाळा माऊसकर यांची उपस्थिती होती.

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त या आरोग्य संकल्प अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. या निमित्ताने ग्रामपंचायत परिसरात वृक्ष रोपण करून जयंती साजरी करण्यात आली. या शिबिराच्या माध्यमातून 300 पेक्षा जास्त नागरिकांनी फायदा घेतला आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी

 रामेश्वर चव्हाण ग्रामविकास अधिकारी, संजय चव्हाण मुख्याध्यापक, रमेश सारे प्रशांत फुलझेले,पंकज कांचोळे, विलास कांबळे, राजेश गडरिया, येतेशाम इनामदार, पंकज पाटील,प्रज्वल हजारे, डॉ.गौतम बेदी, डॉ. शुभम दुर्गे,डॉ. सुलाउद्दीन अहमद, डॉ. आशिता झवर,डॉ. युवा पवार यांचे विशेष योगदान लाभले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये