Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जिल्हात ओला दुष्काळ जाहीर करा, शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या – डॉ.अभ्युदय मेघे 

वर्धा सोशल फोरमच्या वतीने मागणी 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्ह्यात गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून सातत्याने मुसळधार पाऊस सुरू आहे. या सततच्या मुसळधार पावसामुळे वर्धा जिल्ह्यात अनेक गावात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शेतातील पिक जवळपास उध्वस्त झालेले आहे. सोयाबीन कपाशी सद्यस्थितीत पूर्णपणे पिवळे पडले आहे. या पिकांची पुढे वाढ होऊन त्यातून उत्पन्न मिळेल अशी सध्या तरी परिस्थिती शेतकऱ्यांसमोर दिसत नाही. यासोबतच जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या घरात पाणी शिरून त्यांच्या घरातील जीवनावश्यक वस्तूंचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे.

पावसाळ्यात झालेल्या नुकसान ची भरपाई आपला बळीराजा हा रब्बी हंगामात करीत असतो. रब्बी हंगामात शेतकरी त्यांच्या शेतातील विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून खरीप पिक ज्यामध्ये गहू,चना, भुईमूग यासारखे पीक घेत असतो. परंतु सध्या झालेल्या पावसामुळे अनेक गावातील विहिरी देखील खचल्या आहे.

वर्धा सोशल फोरमच्या वतीने वर्धा जिल्हा हा ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्याना हेक्टरी पंचातर हजाराची आर्थिक मदत देण्यात यावी व संपूर्ण कर्ज माफी करावी तसेच विहीर दुरुस्त करण्यासाठी विशेष अनुदान देण्यात यावे अशी वर्धा सोशल फोरमचे अध्यक्ष डॉ अभ्युदय मेघे यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली.यावेळी हरीश पारसे,मंगेश वानखेडे, शुभम लुंगे,गौरव तळवेकर,मनीष तेलरांधे,प्रवीण हळदे,विशाल गोमासे, लीलाधर पाटील, बंटी गोसावी,उमेश नागतोडे,सचिन चौधरी,रवींद्र टप्पे, त्रिशूल राऊत,रवींद्र बेसेकर,श्याम परसोडकर,आशिष गोसावी,नानाजी इवनाते, गजानन कोल्हे,रवींद शेळके,मोहित सहारे,यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये