Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

सावली शहरात वावरत असलेल्या जंगली डुकरांचा बंदोबस्त करा

सावली तालुका काँग्रेस कमिटीची मागणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. शेखर प्यारमवार

   सावली शहरात व आजपासच्या परिसरात जंगली डुकरांचा हौदास वाढल्याने शहरात भीतीचे वातावरण आहे,कोणतीही अनुचित घटना घडू नये या करिता सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नितीन गोहने,नगराध्यक्ष लताताई लाकडे,उपनगराध्यक्ष संदीप पुण्यपकार,शहर अध्यक्ष अमर कोनपत्तीवार, आरोग्य व स्वच्छता सभापती प्रितम गेडाम यांच्या प्रमुख उपस्थितीत वनपरीक्षेत्र अधिकारी मा.विनोद धुर्वे यांना सदर निवेदन देण्यात आले आहे.

दिनांक १६ जुलै २०२४ ला सावली शहर व शहराला लागून असलेल्या शेतात जंगली डुकरांच्या वास्तव्यामुळे जंगली डुकराच्या हल्यात १ ठार तर ६ जखमी झालेले होते या घटनेमुळे सावली शहरात तसेच आजूबाजूला भीतीचे वातावरण पसरले होते, हि घटना ताजी असतानाच काल दिनांक ३० जुलै २०२४ ला श्री. गजानन दशरथ गावतुरे हे स्वतःचा शेतात काम करीत असताना सकाळी १०:०० वाजताच्या दरम्यान त्यांचावर रानटी डुकराने हल्ला चढविला व त्यांना जखमी केलेले आहे तसेच काल दिनांक ३१ जुलै २०२४ ला रानटी डुक्कर व त्याचे पिल्ले हे प्रभाग क्र. १३ व प्रभाग क्र.१४ येथे रात्रोच्या सुमारास शेतातून शहराने प्रवेश करीत आहेत त्यामुळे अनेक शेतकरी वि‌द्यार्थी व नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागतो आहे, कामानिमित्य घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे करिता घटनेचे गांभीर्य लक्ष्यात घेऊन सावली शहरात व आजुबाजू परिसरात वावरत असलेल्या जंगली डुकरांचा बंदोबस्त करून देण्यात यावा असे या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी नगरसेवक सीमा संतोषवार, प्रियंका रामटेके,नगरसेवक प्रफुल वाळके,मा.सचिन संगीडवार,अंतबोध बोरकर,नितेश रस्से नगरसेविका साधना वाढई,ज्योती गेडाम,ज्योती शिंदे,सौ.अंजली देवगडे तसेच टिकाराम रोहणकर,कमलेश गेडाम,राकेश घोटेकर,कुणाल मालवणकर आदी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये