Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

बल्लारपुरमध्ये पिस्तूल व सात जिवंत काडतूस सहित आरोपीला अटक

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रशांत रणदिवे

बल्लारपूर :- शहरातील वस्ती विभागातील कॉलरी परिसरात पिस्तूल व सात जिवंत काडतूस सहित एका आरोपी ला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केले.

          चंद्रपूर जिल्ह्यात अवैध धंदे करणाऱ्या आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश जिल्हा पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन आणि अतिरिक्त पोलिस अधीक्षक रीना जनबंधू यांनी दिले आहेत. त्यामुळे गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने अवैधरित्या शस्त्र बाळगणाऱ्यांची माहिती काढून कारवाई मोहीम सुरू केली आहे. या कारवाई दरम्यान बल्लारपूर येथील भगतसिंग वॉर्डातील कॉलरी मैदानावर एक व्यक्ती कंबरेला देशी बनावटीचे पिस्तूल घेऊन अवैधरित्या फिरत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या पथकाला मिळाली.

        मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक विनोद भुरले हे त्यांच्या पथकासह घटनास्थळी पोहोचले व त्यांनी सदर व्यक्तीला ताब्यात घेतले व चौकशीअंती त्याच्या पँटच्या खिशात एक देशी बनावटीचे पिस्तूल व 7 जिवंत काडतूस व 1 रिकामी केस सापडली. या प्रकरणातील आरोपी रोहित शिवप्रसाद निषाद, 24 रा. भगतसिंग वॉर्ड बल्लारपूर याला अटक करण्यात आली असून बेकायदेशीर शस्त्र बाळगल्याप्रकरणी बल्लारपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला बल्लारपूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

      सदर कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक रिना जनबंधू यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक महेश कोंडावार यांच्या नेतृत्वाखाली पो.उपनि विनोद भूरले, पोहवा दीपक डोंगरे, सतीश अवतारे, नापोशी संतोष येलपुलवार, पोशी गोपाल अटकुलवार, नितीन रायपुरे, गोपीनाथ नरोटे, अमोल सावळे, गणेश भोयर यांनी केले आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये