Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

पोलिसांची गावठी हातभट्टीवर रेड

एकूण 2 लाख 28 हजाराचा मुद्देमाल जागीच नाश

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

         दिनांक 01/08/24 रोजी पोलीस स्टेशन पुलगावं हद्दीत मुखबिर कडून मिळालेल्या माहिती वरून मौजा विजय गोपाल शेतशिवार येथे गावठी हातभट्टीवर रेड केली असता अविनाश कांबळे रा. सावंगी येंडे‍ हा प्लास्टिक ड्रम मध्ये मोहा सोडव्या मध्ये पाणी टाकतांनि दिसून आला पोलीस आल्याची चाहूल लागताच पळून गेला.7 सिंथेटिक टॅंन्क मध्ये 1500 लिटर मोहा सोडवा रसायन व 10 प्लास्टिक कॅनमध्ये अंदाजे 300 लिटर गावठी मोहा दारू व इतर साहित्य असा एकूण किंमत 2,28,000/- रुपयाचा मुद्देमाल तो पंचा समक्ष जागीच नाश केला.

सदरची कारवाई माननीय पोलीस अधीक्षक नुरूल हसन साहेब तसेच अपर पोलीस अधीक्षक सागर कवडे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल चव्हाण साहेब पोनि राहुल सोनवणे, पोउपनी सदानंद वडतकर यांचे मार्गदर्शनात डीबी पथकाचे पो.हवा चंद्रशेखर चुटे, रवींद्र जुगनाके, उमेश बेले यांनी केली.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये