ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

निवडणूक निरीक्षक नरेश झा व निवडणुक खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला यांनी केली सुरक्षा व्यवस्थेची पाहणी

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे

महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक सामान्य निरीक्षक नरेश झा आणि निवडणूक खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला यांचे बुलढाणा जिल्ह्यात आगमन झाले असून त्यांचे आज सिंदखेड राजा विधानसभा मतदारसंघात निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांनी सामान्य निरीक्षक नरेश झा आणि खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला यांचे स्वागत केले.

निवडणुकीच्या अनुषंगाने आज नरेश झा आणि दानिश अब्दुल्ला यांनी सिंदखेडराजा येथील सुरक्षा कक्षाला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहणी केली. सुरक्षेच्या दृष्टीने काही महत्वाच्या सूचना झा यांच्याकडून देण्यात आल्या. मतदान यंत्रे सुरक्षा कक्षाची पाहणी केली आहे तसेच CCTV च्या सुरक्षितेविषयी खातरजमा झा यांच्याकडून करण्यात आली.

निवडणुकीच्या अनुषंगाने फिरते पथक, स्थिर पथक यांची संख्या सद्यस्थितीमध्ये पुरेशी आहे, आंतर जिल्ह्याच्या ठिकाणी चेक पोस्ट सक्रिय आहे, C-vigil ऍपवर येणाऱ्या तक्रारींचे निवारण करण्यासाठी एक नवीन टीम गठीत करण्यात आली आहे, इत्यादी विषयाचा आढावा घेण्यात आला.

सिंदखेडराजा विधानसभा मतदार संघातील कायदा व्यवस्था, संवेदनशील मतदारसंघ याबद्दल आढावा घेतला.

 सामान्य निरीक्षक नरेश झा आणि खर्च निरीक्षक दानिश अब्दुल्ला यांच्याकडून सिंदखेडराजा मतदारसंघांमध्ये स्थापन केलेल्या सावरगाव माळ आणि बोराखेडी बावरा येथील दोन SST पथकाला भेटी देण्यात आल्या. बोरखेडी बावरा येथील SST पथक प्रमुख अनिकेत राठी, सहाय्यक राहुल खेडकर, पोलीस सहाय्यक ज्ञानेश्वर चमकुरे यांना गाडी तपासणी करताना ड्राइवर सीट च्या खाली पाहणी करावी, मागील डिकीमध्ये व्यवस्थित पाहणी कारवी, गाडीच्या बोनेट तसेच गाडी मधील बॅग, पिशवी, पोते अश्या काही संशयास्पद वस्तूंची पाहणी करण्याच्या काही महत्त्वाच्या सूचना दिल्या नरेश झा यांनी SST पथकातील कर्मचाऱ्यांना दिल्या.

आजच्या आढावा दौऱ्यामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे, तहसीलदार सिंदखेड राजा अजित दिवटे, तहसीलदार देऊळगावराजा वैशाली डोंगरजाळ, गट विकास अधिकारी सिंदखेडराजा मुकेश माहोर, निवडणूक नायब तहसीलदार सिंदखेडराजा मनोज सातव, निवडणूक नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रवीण घोटकर, नायब तहसीलदार सिंदखेड राजा अस्मा मुजावर, नायब तहसीलदार देऊळगाव राजा सायली जाधव, नायब तहसीलदार देऊळगाव राजा प्रांजल पवार, प्र. नायब तहसीलदार नितीन बढे, प्रसार माध्यम नोडल अधिकारी अंकुश म्हस्के, प्रकाश शिंदे,संजय सोनुने,महसुल सहाय्यक इत्यादी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Back to top button
कॉपी करू नये