Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

ब्रह्मपुरी नगरपरिषदेत अग्निशमन बुलेट दाखल

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. नंदू गुद्देवार

ब्रम्हपुरी नगरपरिषदेसाठी आधुनिक सुविधायुक्त अग्निशमन यंत्र असलेली रॉयल इन्फिल्ड कंपनीची बुलेट नुकतीच दाखल झाली आहे.आणि या बुलेट वाहनांची टेस्ट राईड घेतली.

आग विझविण्यासाठी शहरात चारचाकी मोठी अग्निशमन वाहन उपलब्ध असली तरी छोट्या गल्ली बोळामध्ये वाहन नेता येत नसल्याने आता ब्रम्हपुरी नगरपरिषदेसाठी आधुनिक सुविधायुक्त अग्निशमन बुलेट दाखल झाले आहे. नगरपरिषदेला महाराष्ट्र अग्निशमन सेवा संचालनालय व्दारा महाराष्ट्र फायर सर्विसेसने हे वाहन पुरविले आहे.सुविधायुक्त असलेले हे वाहन शहरातील गल्ली बोळामध्ये नेता येत असल्याने आगीचे तत्काळ नियंत्रण मिळविण्यासाठी सोयीचे ठरणार आहे.दुचाकी गाडीला अग्निशमन यंत्र असलेली रॉयल इन्फिल्ड कंपनीचे बुलेट मध्ये पोलीस सायरन, आरोग्य सेवा सायरन,वॉकी टॉकी ,स्पिकर लायटिंग सेट त्यांच्या सोबतच इतर सुविधा या वाहणात उपलब्ध आहेत.

या अग्निशमन बुलेट चालक मुखरू राऊत यांनी प्रथमता असणाऱ्या आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी खुप सोयीचे होणार आहे. शहरात अग्निशमन बुलेट दाखल झाल्याने नागरिकांसाठी कुतुहलाचा विषय ठरला आहे

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये