Sudarshan Nimkar
ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

विजाभज आश्रमशाळा शिक्षकांची प्रलंबित प्रकरणे तात्काळ निकाली काढा- आ. अडबाले

मनुष्यबाळाची कमतरता असल्याने राज्यातील सर्व जिल्हा कार्यालयांना कर्मचारी पुरवठा करण्याची आमदार सुधाकर अडबाले यांची संचालकाकडे मागणी

चांदा ब्लास्ट

 “समस्‍या तुमच्या, पुढाकार आमचा” या उपक्रमाअंतर्गत विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे सरकार्यवाह तथा आमदार सुधाकर अडबाले यांच्या अध्यक्षतेखाली विजाभज आश्रमशाळेतील शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित समस्‍यांबाबत सहविचार सभा दि. २० सप्टेंबर रोजी इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय,चंद्रपूर येथे सहा. संचालक आशा कवाडे यांचे कार्यालयात पार पडली.

आश्रमशाळांचे वेतन अनियमित होत असल्यामुळे सभेत नियमित वेतनाबाबत गंभीरपणे चर्चा करून शासन निर्णयानुसार वेतन १ तारखेला खात्यात जमा करण्याच्या सूचना आमदार अडबाले ;यांनी सहा. संचालकांना दिल्या. त्याचप्रमाणे सर्व शाळांच्या सुधारित संचमान्यता करणे, अतिरिक्त शिक्षकांचे समायोजन समुपदेशन पद्धतीने करणे, मागील सत्राच्या भ.नि.नि. पावत्या तात्काळ वितरित करणे, जिल्ह्यातील अनुकंपा धारकांचे प्रस्ताव शासन मान्यतेसाठी तात्काळ पाठवून कर्मचाऱ्यांना सेवेत रुजू करणे, कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ/निवड श्रेणीचे प्रस्ताव नियमानुसार ४५ दिवसाच्या आत मार्गी लावणे, प्रलंबित वैद्यकीय प्रतिपूर्ती प्रस्ताव किमान एका आठवड्यात निकाली काढणे, निवृत्त कर्मचाऱ्यांचा सातवा आयोगाचा ५ वा हप्ता लगेच अदा करणे या व इतर समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. बहुतांश उपस्थित समस्याग्रस्तांची प्रकरणे समोरासमोर स्वाक्षरी करून निकाली काढण्यात आले.

जिल्हा स्तरावर इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय हे नुकतेच सामाजिक न्याय विभागातून वेगळे करून सुरू झाले असल्याने तेथे मनुष्यबळाची कमतरता असून त्यामुळे प्रकरणे प्रलंबित आहेत अशी माहिती सहाय्यक संचालकांनी दिली. प्रश्नांचे गांभीर्य लक्षात घेऊन आमदारांनी तात्काळ विभागाचे संचालक ज्ञानेश्वर खिलारी यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क करून जिल्हा कार्यालयांना कर्मचारी देण्याची मागणी केली, ती मान्य करून लवकरच कर्मचारी पाठवण्याची हमी संचालकांनी दिली.

सहविचार सभेकरिता विदर्भ माध्यमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष केशव ठाकरे, जिल्हा कार्यवाह श्रीहरी शेंडे, लक्ष्मणराव धोबे, महानगर कार्यवाह सुरेंद्र अडबाले, आश्रमशाळा विभागाचे जिल्हा अध्यक्ष दिलिप गोखरे, जिल्हा कार्यवाह किशोर नगराळे, दिनेश चौधरी, पद्माकर वनकर, राज्यपाल बोरकर, संतोष वासेकर, कु. सरोज तेलंग व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये