अल्पवयीन वाहण चालकाचे पालकास न्यायालयाकडून द्रव्यदंडाची शिक्षा

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस स्टेशन हिंगणघाट हद्दित दिनांक 15/08/2026 रोजी तिन अल्पवयीन मुलींचा अपघात होवुन आपले प्राण गमवावे लागले होते. त्याघटनेची दखल घेत वर्धा जिल्हा पोलीस अधिक्षक श्री सौरभ कुमार अग्रवाल यांचे आदेशान्वये अपर पोलीस अधिक्षक श्री सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात उपविभागीय पोलीस अधिकारी श्री सुशिल कुमार नायक तसेच पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील ठाणेदार श्री अनिल राउत यांनी हिंगणघाट शहरातील अल्पवयीन वाहण चालकांचे पालकांनवर कारवाई करण्या करीता विशेष मोहिम राबविण्यात आली होती. विशेष मोहिमे दरम्याण हिंगणघाट शहरातील अल्पवयीन मुलांना वाहण चालविण्यापासुन प्रतिबंध घालण्यासाठी अल्पवयीन मुले दुचाकी वाहण चालवितांना मिळताच त्यांचे जवळ मिळुन आलेले वाहणाचे मालक तसेच पालकांवर कलम 199 (अ) मोटार वाहण कायद्यान्वये कारवाई करण्यात आली होती व सध्या हि हिंगणघाट शहरामध्ये कारवाई करणे सुरूच आहे. सदर मोहिम राबण्यिाचा मुख्य उद्देश अपघातावर प्रतिबंध घालणे व रोखणे आहे. पोलीस स्टेशन हिंगणघाट कडून बरेच अल्पवयीन वाहण चालकांचे पालकांवर कलम 199 (अ) मोटार वाहण कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले असुन तपासाअंती सदर प्रकरणी मा. न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केलेले आहेत.
मा. न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या प्रकरणात अल्पवयीन वाहण चालकाचे वडील जितेन्द्र आनंदराव रघाटाटे, रा. बिडकर वार्ड, हिंगणघाट यांना कलम 199(अ) मोटार वाहण कायद्यन्वये मा. न्यायालयाने दोषी ठरवत आज दिनांक 13/10/2026 रोजी 25,100 रू. द्रव्यदंडाची शिक्षा ठोठाविलेली आहे. यापासुन सर्व पालकांनी बोध घेवुन आपले अल्पवयीन मुला मुलींना वाहण चालविण्यास देवु नये असे आव्हान हिंगणघाट पोलीसांकडून सर्व पालकांना करण्यात आलेले आहे. तसेच यापुढे सुध्दा याच प्रकारे हिंगणघाट पोलीसांकडून कारवाई सुरूच राहणार असल्याचे कळविलेले आहे.
अनिल राऊत पोलिस निरीक्षक पो स्टे. हिंगणघाट, जि. वर्धा



