ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

स्थानिक गुन्हे शाखा वर्धाचे पथकाने पोलीस स्टेशन हिंगणघाट येथील गुन्ह्यातील 31 वर्षापासून पसार असलेल्या आरोपी चा शोध घेऊन ठोकल्या बेड्या 

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

पोलीस स्टेशन, हिंगणघाट, जिल्हा – वर्धा येथील अप. क्र. 195/1995 कलम 457,380 भा. द. वि. च्या गुन्ह्यातील पाहिजे आरोपी दिलीप नथुजी ढोरे, रा वनी जिल्हा यवतमाळ याच्या शोध कामी स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथक समांतर तपास करीत असताना सदर आरोपी बाबत स्थानिक गुन्हे शाखा वर्धा चे पथकाला कोणतेही माहिती नसताना पथकाने आरोपीबाबत माहिती काढून माहितीच्या आधारे त्याचा वनी, जिल्हा – यवतमाळ येथे शोध घेतला असता पाहिजे आरोपी नामे दिलीप नथुजी ढोरे हा साखरा (कोलगाव), ता. वणी, जिल्हा – यवतमाळ येथे राहत असल्याबाबत गोपनीय व तांत्रिक माहिती मिळाल्याने तात्काळ पथक साखरा (कोलगाव), ता. वणी, जिल्हा – यवतमाळ येथे रवाना होऊन पाहिजे आरोपीचा शोध घेत असता पाहिजे आरोपी नामे दिलीप नथुजी ढोरे , वय 54 वर्ष, रा. साखरा (कोलगाव), ता. वणी, जिल्हा – यवतमाळ हा मिळून आल्याने त्याच ताब्यात घेऊन, त्याच ताब्यात घेतल्या बाबत त्याचे नातेवाईक यांना माहिती देऊन वरील पाहिजे आरोपी यास पुढील कारवाई करता पोलीस स्टेशन हिंगणघाट यांचे ताब्यात देण्यात आले.

सदर यशस्वी कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल, मा. अप्पर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पो. उपनि. विजयसिंग गोमलाडू, पोलीस अंमलदार मनोज धात्रक, महादेव सानप, हर्षल सोनटक्के, अभिषेक नाईक , सर्व स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा व अक्षय राऊत, सायबर सेल वर्धा यांनी पार पाडली आहे.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये