ग्रामीण वार्ताताज्या घडामोडीमहाराष्ट्र

वर्धा जिल्हा पोलीस दलाची माहे सप्टेंबर-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक संपन्न

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे

वर्धा जिल्हा पोलीस दलाच्या वतीने माहे सप्टेंबर-२०२६ ची मासिक गुन्हे आढावा बैठक आज दिनांक १३ ऑक्टोबर २०२६ रोजी पोलीस अधीक्षक कार्यालयात पार पडली. ही बैठक मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल आणि मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. सदाशिव वाघमारे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

या महत्त्वपूर्ण बैठकीत जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, आगामी सण-उत्सवांच्या काळातील प्रतिबंधक उपाय, सायबर सुरक्षा तसेच पोलीस प्रशासकीय कामकाजाबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला व महत्त्वाच्या सूचना देण्यात आल्या, बैठकीदरम्यान विविध विषयांवर संबंधित अधिका-यांमार्फत पॉवरपॉइंट प्रेझेंटेशन (PPT) द्वारे आणि प्रशासकीय मुद्यांवर मार्गदर्शन करण्यात आले.

बैठकीतील प्रमुख मुद्दे व सादरीकरणः

आगामी सण-उत्सव आणि नवरात्रोत्सवः नवरात्रोत्सवाच्या अनुषंगाने वर्धा शहरचे पोलीस निरीक्षक श्री. चतरकर यांनी पीपीटी सादरीकरण केले.

जिल्ह्यातून एकूण १२५६ देवींच्या प्रतिष्ठापनेचा आणि नवरात्रीच्या अनुषंगाने विशेष सतर्कता बाळगण्याचा आढावा घेण्यात आला. कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, प्रभावी वाहतूक व्यवस्थापन, ध्वनिप्रदूषण नियंत्रण आणि मंडळांमधील गैरसमज टाळण्यासाठी योग्य ती दक्षता घेण्याचे सुचवण्यात आले. प्रत्येक मंडळात एक जबाबदार अधिकारी नेमून समन्वय साधण्यासाठी विशेष व्हॉट्सअॅप ग्रुप तयार करण्यात आला आहे.

उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या अंमलदारांना प्रमाणपत्र देऊन गौरवण्यात येणार आहे.

सायबर जनजागृती महिना (ऑक्टोबर २०२६) सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. पाटील यांनी दिनांक १ ते ३१ ऑक्टोबर दरम्यान ‘सायबर जनजागृती महिना’ एकूण ७ टप्प्यांत (उद्घाटन ते समारोप) राबवल्या जाणाऱ्या उपक्रमाचा सविस्तर कार्य आराखडा प्रस्तुत केला.

राजकीय/सामाजिक आंदोलने व कायदा व सुव्यवस्था सज्जता: आगामी काळातील विविध पक्षांच्या आंदोलनांच्या अनुषंगाने विशेष सतर्कता बाळगण्याचे निर्देश देण्यात आले. आंदोलने हाताळताना योग्य ती काळजी व संयम बाळगण्याच्या सूचना देण्यात आल्या असून सोशल मीडियावर सातत्याने कडक नजर ठेवण्याबाबत सांगण्यात आले.

अवैध धंदे, गुन्हेगारी आणि एनडीपीएस (NDPS) कारवाई: अवैध धंदे, स्ट्रीट क्राईम, चेन स्नॅचिंग, जबर चोरी, वाहन चोरी आणि सराईत गुन्हेगारांवर कठोर कारवाईचे आदेश देण्यात आले. दारूबंदी आणि एनडीपीएस (NDPS) अंतर्गत प्रभावी कारवाई करण्यावर विशेष भर देण्यात आला असून गुन्हेगारांवर सतत वचक ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

मा. पोलीस अधीक्षक श्री. सौरभ कुमार अग्रवाल यांचे निर्देशः

दिले:-पीपीटी सादरीकरणानंतर घेतलेल्या गुन्हे आढावा बैठकीत मा. पोलीस अधीक्षक यांनी खालीलप्रमाणे महत्त्वाचे निर्देश

कार्यशाळा आयोजनः कायदा व सुव्यवस्था (L&O) बाबत आणि महत्त्वाच्या कायदेविषयक मुद्यांवर सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी (SDPO) आणि शहर पोलीस निरीक्षक (City PI) यांनी एकत्रित येऊन कार्यशाळांचे आयोजन करावे.

दोषारोप निर्गती (Charge Sheet): दोषारोप पत्र मुदतीत कोर्टात सादर करण्याबाबत निर्देश देण्यात आले.

अपघात तपासणी (Fatal Accidents): अपघाती गुन्ह्यांचा तपास अत्यंत गांभीर्यान व शास्त्रीय पद्धतीने करून अपघाती मृत्यूचे प्रमाण कमी करण्याचाबत सूचना दिल्या.

सेशन कमिटेड केसेसः पोलीस अकार्यक्षमतेमुळे किंवा दिरंगाईमुळे कोणतीही ‘सेशन कमिटेड केस’ सुटायला नको, याबाबत विशेष काळजी घ्यावी.

पोलीस स्टेशनचे वातावरण व कल्याणकारी उपायः पोलीस स्टेशनचे वातावरण ताणतणावमुक्त व चांगले ठेवण्याबाबत निर्देश देण्यात आले. तसेच, पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी पोलीस कुटुंबाशी नियमित संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून घ्याव्यात.

उपस्थितीः

या बैठकीस वर्धा जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी, सर्व पोलीस ठाण्यांचे ठाणेदार, स्थानिक गुन्हे शाखा, सायबर पोलीस ठाणे, विशेष शाखा आणि इतर सर्व संबंधित शाखांचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते.

आढावा बैठकीनंतर मा. पोलीस अधीक्षक आणि अपर पोलीस अधीक्षक यांनी बैठकीत उपस्थित सर्व अधिकारी व अंमलदार यांच्यासोबत स्नेहभोजन घेतले.

शेअर करा

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
कॉपी करू नये