वाहतुकिच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. अविनाश नागदेवे
पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल व मा. अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांचे मार्गदर्शनात दिनांक १३/१०/२०२६ रोजी वर्धा शहरालगत असलेल्या बायपास रोडवर स्टंटबाजी करणारे व वाहतूक नियमाचे उल्लघण करणाऱ्या वाहण चालकांवर विशेष मोहिम राबवून दत्तपुर ओव्हर ब्रिज, जुनापाणी ओव्हर ब्रिज, हिंदी विश्वविद्यालय ओव्हर ब्रिज, सावंगी मेघे लोखंडी ओव्हर ब्रिज, शांतीनगर, नागठाणा ओव्हर ब्रिज या ठिकाणी जोवन सुरक्षा अभियान मा. सुनिल महाडीक, उपविभागीय पोलीस अधिकारी, उपविभाग वर्धा, वाहतुक नियंत्रण शाखा, वर्धा चे प्रभारी अधिकारी विजयकुमार घुले, पोउपनी अमोल लगड व वाहतुक अंमलदार यांनी वाहतुक व्यवस्था सुरळीत राहावी तसेच वाहन चालकांचे सुरक्षिततेच्या दृष्टीने तसेच अपघात रोखण्यासाठी रस्त्यांवर वाहतुकीस अडथळा निर्माण होईल अशा स्थितीत उभी करण्यात आलेल्या अवजड वाहनांवर तसेच ट्रिपलसिट, दुचाकी वाहनावर हेल्मेट न वापरनारे, स्टंटबाजी करणारे वाहन चालक, चारचाकी वाहनावर सिटबेल्ट न वापरणारे चालकांवर व वाहतुकिच्या नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर मोटार वाहन कायद्यान्वये कारवाई करण्यात आली. या कारवाई दरम्यान वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहन चालकांवर एकूण ६३ चलान केसेस मोटार वाहन कायद्यान्वये करण्यात आल्या असून ५०,५०० / रु. चा दंड करण्यात आलेला आहे.
सदर मोटार वाहन कायद्यांन्वये करण्यात येणारे कारवाईचा उद्देश हा दंड वसुल करण्याचा नसून वाहन चालकांना शिस्त लावण्याकरीता तसेच सर्व नागरीकांचे सुरक्षित प्रवासाकरीता असून नागरीकांच्या सुरक्षिततेला प्रथम प्राधान्य देण्यात येत आहे.
वर्धा शहरालगत असलेल्या बायपास रोडवर स्टंटबाजी करणारे व वाहतुक नियमाचे उल्लघण करणाऱ्या वाहण चालकांवर विशेष मोहिम राबवून ट्रिपलसिट, दुचाकी वाहनावर हेल्मेट न वापरनारे, चारचाकी वाहनावर सिटबेल्ट न वापरणारे चालकांवर शहरालगत असलेल्या बायपास दत्तपुर ओव्हर ब्रिज, जुनापाणी ओव्हर ब्रिज, हिंदी विश्वविद्यालय ओव्हर ब्रिज, सावंगी मेघे लोखंडी ओव्हर ब्रिज, शांतीनगर, नागठाणा ओव्हर ब्रिज या ठिकाणी नियमित सदरची कारवाई करण्यात येणार आहे.
(विजय कुमार घुले) स.पो.नि/वा.नि.शा.वर्ध



