अपघातामुळे जनावरांची तस्करी उजेडात
कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आकापूर जवळ अपघात
चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. मंगेश पोटवार
गडचिरोली वरून हैद्राबाद येथे कत्तलीसाठी जनावरे कोंबून नेणाऱ्या ट्रक(क्रमांक CG-07-CB-0717) चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने गडचिरोली-मूल महामार्गावरील आकापुर गावाजवळील वळणावर अपघात झाला यात अंदाजे ३० ते ३५ जनावरांचा दुर्दैवी मृत्यू झाला.ही घटना बुधवारी सकाळी ६ वाजता घडली.
दिवसेदिवस गो-वंश तस्करी थांबली पाहिजे यासाठी शासन वेळवेगळे निर्णय घेऊन तस्करीवर निर्बंध लावण्याचा सरकार प्रयत्न करताना दिसत असली तरी गोवंश तस्करी थांबताना दिसत नाही.अशातच १७ जुलै च्या सकाळी दिवस उजाडत भयावह दृश्य अनेकांच्या काळीज चिरणारे होते.अवैधरित्या तस्करी साठी जनावरे घेऊन जाणाऱ्या ट्रकचा आकापूर गावाजवळील वळणावर अपघात होऊन मोट्या प्रमाणात जनावरे मृत्यूमुखी पडली. मृत जनावराचा निश्चित आकडा अजूनपर्यत कळला नसला तरी ती सख्या ३० ते ३५ च्या जवळपास असल्याचे समजते.
अपघाताची माहिती मिळताच मुलं पोलिसाचा ताफा अपघातस्थळी दाखल झाले.पुढील तपास मूल पोलीस करीत आहे.