समर्थ कृषी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी घेतले हरितगृह व्यवस्थापन तसेच मशरूम उत्पादन तंत्रज्ञानाचे प्रशिक्षण

चांदा ब्लास्ट प्रतिनिधी. प्रा. अशोक डोईफोडे
महाराष्ट्र राज्य फलोत्पादन व औषधी वनस्पती मंडळ, पुणे, महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ, पुणे तसेच कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर (जिल्हा अमरावती) यांच्या संयुक्त विद्यमाने हरितगृह व्यवस्थापन व मशरूम उत्पादन तंत्रज्ञान या विषयावर आयोजित प्रशिक्षण वर्गाचे भव्य उद्घाटन कृषी विज्ञान केंद्र, दुर्गापूर, बडनेरा येथे उत्साहात पार पडले.
या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन मा. श्री गणेश घोरपडे, विभागीय कृषी सहसंचालक, अमरावती यांच्या शुभहस्ते झाले. यावेळी मा. डॉ. के. पी. सिंग, वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख, कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर, माननीय श्री प्रफुल्ल महल्ले, विषयतज्ज्ञ (उद्यानविद्या), तसेच मा. श्रीमती अर्चना काकडे, विषयतज्ज्ञ (गृहविज्ञान), कृषी विज्ञान केंद्र दुर्गापूर यांची प्रेरणादायी उपस्थिती लाभली.
या प्रशिक्षणात समर्थ कृषी महाविद्यालय, देऊळगाव राजा येथील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रशिक्षणात सहभागी विद्यार्थ्यांमध्ये भाग्यश्री ठाकरे, प्रगती उगले, निधी शेलके,शितल वाघमारे, सृष्टी सावळे, अदिती धनवे, प्रणिता हीवाळे, सुमित मांटे व सुजित मेहत्रे यांचा समावेश होता.
हरितगृह तंत्रज्ञान, आधुनिक मशरूम उत्पादन पद्धती, बाजारपेठेतील संधी तसेच शाश्वत शेतीविषयक मार्गदर्शनामुळे हे प्रशिक्षण विद्यार्थ्यांसाठी अत्यंत उपयुक्त ठरले. या उपक्रमामुळे विद्यार्थी भविष्यातील कृषी उद्योजकतेसाठी अधिक सक्षम होतील, असा विश्वास मान्यवरांनी व्यक्त केला.
या प्रशिक्षणासाठी डॉ. नितीन मेहेत्रे प्राचार्य, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा यांचे सहकार्य व मार्गदर्शन लाभले .हेमंत जगताप,वरिष्ठ प्रशिक्षण अधिकारी एम सी डी सी पुणे यांचे विशेष आभार मानण्यात आले. २३ डिसेंबर २०२५ राष्ट्रीय शेतकरी दिनानिमित्त विशेष गौरवाचा क्षण या शुभप्रसंगी तरुण महिला शेतकरी व कृषी शिक्षणाला प्राधान्य देत त्यांना शेतीच्या मुख्य प्रवाहात सक्रियपणे जोडण्याच्या कार्याची दखल घेऊन प्रा.अश्विनी विनायक जाधव (जैवतंत्रज्ञान) कृषी वनस्पतीशास्त्र विभाग, समर्थ कृषी महाविद्यालय देऊळगाव राजा. शेतकरी सन्मानाने गौरविण्यात आले, ही अत्यंत अभिमानाची बाब आहे.
हा सन्मान डॉ.अर्चना काकडे तसेच मा. ए. पी. सिंग,वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख के वी के दुर्गापुर,अमरावती यांच्या हस्ते प्राप्त झाला.
हा गौरव अधिक जबाबदारीने, निष्ठेने व नव्या ऊर्जा-स्फूर्तीने तरुण महिला शेतकरी सक्षम करण्याच्या दिशेने कार्य करण्यासाठी प्रेरणादायी ठरेल.
या सन्मानाबद्दल हेमंत जगताप यांचे मनःपूर्वक आभार शाश्वत शेती – सक्षम शेतकरी – सबल भारत



